jyoti and alok maurya sakal
देश

Jyoti and Alok Maurya Case: ज्योती मौर्य प्रकरणाचा धसका; पतीने क्लासमधून काढलं म्हणून पत्नीची पोलिसांत धाव

पिंटूने ज्योती मौर्याबद्दलचा व्हायरल व्हिडीओ पाहिल्यावर आपल्या पत्नीचा क्लास बंद केला.

वैष्णवी कारंजकर

देशभरात गाजत असलेल्या ज्योती आणि आलोक मौर्य प्रकरणाचा फटका अनेक तरुणींना बसला आहे. बिहारच्या बक्सर इथं सरकारी नोकरीसाठीच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या पत्नीचा अभ्यास एका पतीने बंद केला आहे. पिंटू असं या व्यक्तीचं नाव सांगण्यात येत असून त्याची पत्नी खूशबू बीपीएससीची तयारी करत होती.

याबाबत पिंटूचं असं म्हणणं आहे की त्याचं त्याच्या पत्नीवर खूप प्रेम आहे आणि म्हणूनच त्याने तिचा क्लास बंद केला आहे. आपली पत्नीही ज्योती मौर्यप्रमाणे मोठी ऑफिसर होईल आणि आपल्याला सोडून जाईल, अशी भीती त्याला वाटते. पिंटूने ज्योती मौर्याचा व्हायरल व्हिडीओ पाहिल्यावर आपल्या पत्नीचा क्लास बंद केला.

तर पिंटूची पत्नी खूशबूचं असं म्हणणं आहे की, तिला बीपीएससीचा क्लास करून अधिकारी व्हायचं होतं. पण ज्योती मौर्यबद्दल ऐकल्यावर पतीने क्लास बंद करून टाकला. एसडीएम ज्योती मौर्य सध्या चांगलीच चर्चेत आहेत. एसडीएम झाल्यावर ज्योतीने पतीला सोडलं आणि दुसऱ्या एका अधिकाऱ्यासोबत संबंध ठेवले असा आरोप तिच्या पतीने तिच्यावर केला आहे.

हे प्रकरण ऐकताच बिहारमधल्या पिंटूने आपली पत्नी खूशबूचा क्लास बंद केला. खूशबू प्रयागराजमध्ये क्लासला जात होती. पण पिंटूने तिला परत बोलावून घेतलं आहे आणि क्लासची फी द्यायलाही नकार दिला आहे.  खूशबूने पिंटूची मनधरणी करण्याचा खूप प्रयत्न केला. पण पिंटू ऐकायला तयारच नाही. त्यामुळे तिने थेट पोलीस स्टेशन गाठलं.

तिथे जाऊन खूशबूने पोलिसांना आपल्या पतीला समजावण्याची विनंती केली. जेणेकरून ती पुन्हा एकदा क्लासला जाऊ शकेल आणि अभ्यास करून परीक्षा देऊ शकेल. पोलीस स्टेशनमध्ये हे प्रकरण पोहोचल्यानंतर पिंटूलाही पोलिसांनी बोलवून घेतलं. खूशबूने आपला पती आणि पोलिसांसमोर हेही सांगितलं की मी ज्योती बनणार नाही, मी ‘बेवफा’ नाहीये.

याबद्दल आजतकने पिंटूशी बोलण्याचा प्रयत्न केला. पिंटू म्हणाला, “माझं माझ्या पत्नीवर प्रेम आहे. पण म्हणूनच मी तिला कोचिंग क्लासला पाठवू शकत नाही. माझ्या पत्नीचंही माझ्यावर प्रेम आहे. मी माझं प्रेम गमावू इच्छित नाही. ” पिंटूचं म्हणणं आहे की, ज्योती जोपर्यंत एसडीएम झाली नव्हती तोवर ती तिचा पती आलोकवर प्रेम करत होती. पण अधिकारी झाल्यावर लगेचच तिने आलोकला सोडलं. माझ्या पत्नीने मला अशा प्रकारे सोडावं, असं मला वाटत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'माझ्याशी स्पर्धा करायची असेल तर ४ हजार किमी चालावं लागेल'; राहुल गांधींनी नेमका कुणाला लगावला टोला? वाचा...

Killedharur News : कृषी उत्पन्न बाजार समितीतील ३१ भूखंडाची लिलावा प्रक्रिया पारदर्शक व्हावी; संचालक संदीप शिनगारे यांचे सलग दुसऱ्या दिवशी आमरण उपोषण सुरू

Andaman Festival : लोणी काळभोरच्या देवयानी ननवरेने अंदमानमध्ये गाजवला नृत्यकलेचा ठसा; आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक महोत्सवात प्रथम क्रमांक

Pachod News : तब्बल ४८ तासानंतर आर्यन उर्फ आयुषचा मृतदेह आढळला; श्यामचा शोध सुरूच..!

Donald Trump: ऐतिहासिक भेट! चीनमध्ये पहिल्यांदाच एकत्र आले ट्रम्प, पुतिन अन् शी जिनपिंग; बैठकीत काय चर्चा होणार?

SCROLL FOR NEXT