jyotiraditya scindia removes congress identity from his twitter 
देश

Video: स्वतःचा मास्क काढून दुसऱ्याला घातला; ज्योतिरादित्य झाले ट्रोल

सोशल मीडियातून झाले टीकेचे धनी

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत असं दिसून आलं की, त्यांनी स्वतःच्या तोंडावर लावलेला मास्क काढून दुसऱ्या व्यक्तीच्या तोंडावर लावला. त्यांच्या या कृतीमुळं त्यांच्यावर मोठी टीका होत आहे.

एका कार्यक्रमात ज्योतिरादित्य शिंदे उपस्थित होते. यावेळी ग्वाल्हेरचे माजी खासादर अरुण मिश्रा यांनी देखील या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. दरम्यान, शिंदे यांनी आपल्या तोंडावरचा मास्क काढला आणि तो मिश्रा यांच्या तोंडावर लावला. त्याचवेळी एकानं हे दृश्य मोबाईलच्या कॅमेरॅत चित्रीत केलं. त्यानंतर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला.

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ज्योतिरादित्य शिंदे यांचे सहकारी गोविंद यांनी स्पष्टीकरण दिलं. ते म्हणाले, "या कार्यक्रमात अरुण मिश्रा यांनी तोंडावर मास्क लावलेला नव्हता. पण शिंदे यांनी आपल्या तोंडावर दोन मास्क लावले होते. त्यामुळे त्यांनी तत्काळ आपल्या तोंडावरचा एक मास्क काढून तो मिश्रा यांच्या तोंडावर लावला. यावेळी शिंदे यांच्या तोंडावर N95 मास्क लावलेला होता. शिंदे हे कायम दोन मास्क वापरत असतात. विशेषतः सार्वजनिक कार्यक्रमात ते N95 मास्क वापरतात. त्यावर ते सर्जिकल मास्क लावतात. कोरोनापासून वाचण्यासाठी दोन मास्क लावणं योग्य असल्याचं तज्ज्ञ सांगतात"

दरम्यान, हा व्हिडिओ समोर आल्यानंतर काँग्रेसने थेट केंद्र सरकार हल्लाबोल केला. काँग्रेसनं म्हटलं की, "भाजपकडून राज्यांमध्ये सभा आणि यात्रा काढताना करोडो रुपये खर्च केले जातात. पण आपल्या पक्षांच्या लोकांना मास्क दिले जात नाहीत. अशा कार्यक्रमांमध्ये सर्वजण मास्क वापरत आहेत की नाही, हे सरकारने बंधनकारक केलं पाहिजे"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मी अजून लग्न केलेलं नाही...!; राष्ट्रपतींचे ADC राहिलेल्या मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी सांगितलं कारण, म्हणाले, ''नियमानुसार...''

MPSC Transparency issue: एमपीएससीच्या कारभारावर अपारदर्शकतेचे सावट; बैठकींचे इतिवृत्त व वार्षिक अहवाल लपविल्याने विद्यार्थ्यांचा विश्वास डळमळीत

Legislative Estimate Committee: यवतमाळमध्ये अंदाज समितीच्या मागावर ‘खबऱ्यांचे नेटवर्क’? वाहनांचे फोटो व्हॉट्सअॅप ग्रुपवर व्हायरल

Amravati Food Safety Action: अमरावतीत घाणेरड्या वातावरणात नूडल्स निर्मिती; कुत्रे-मांजरांचा वावर उघड, दोन गृहउद्योगांचे परवाने तातडीने निलंबित

Marathi News Live Updates: पाषाण-बावधन रस्त्यावर भरधाव कारची धडक, सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृत्यू

SCROLL FOR NEXT