kaali movie poster mahua moitra trinamool congress condemns itself comments on goddess sakal
देश

कालीमाता मांस, मद्य ग्रहण करणारी देवी - महुआ मोईत्रा

महुआ मोईत्रा यांचे मत, चित्रपट निर्मात्या लीना यांचे समर्थन

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : ‘‘माता काली ही माझ्यासाठी मांस व मद्य ग्रहण करणारी देवी आहे,’ असे विधान करून तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी काली’ या माहितीपटाच्या पोस्टरवरून सुरू झालेल्या वादात उडी घेतली आहे. चित्रपट निर्मात्या लीना मणिमेकलाई यांच्या ‘काली’ या माहितीपटाच्या पोस्टरवर कालीमाता सिगारेट ओढताना दाखविली आहे. यामुळे देशभरात संताप व्यक्त होत असतानाच महुआ मोईत्रा यांनी ‘काली मातेला मी मांस व मद्य ग्रहण करणाऱ्या देवीच्या रूपात पाहते,’ असे सांगत मणिमेकलाई यांची बाजू घेतली.

‘आपापल्या पद्धतीने देवतेचे चित्र रंगविण्याचा आणि तिचे पूजन करण्याचे स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. देवदेवतांना व्हिस्कीचा नैवेद्य दाखविण्याची प्रथाही काही ठिकाणी आहे. हे ईश्‍वरनिंदा ठरू शकते,’असेही त्या म्हणाल्या. एका वृत्तवाहिनीवरील कार्यक्रमात त्या बोलताना मोईत्रा म्हणाल्या, की तुम्ही सिक्कीमला गेलात तर तेथे काली मातेला व्हिस्की देण्याची प्रथा असल्याचे दिसेल तर उत्तर प्रदेशात गेला आणि सांगितले की तुम्ही काली मातेला प्रसादात व्हिस्की ठेवल्याचे सांगितले तर तेथे याला ईश्‍वराची निंदा केली असे म्हटले जाईल.

फासावर लटकवायला हवे

दरम्यान, सिगारेट ओढणारी व हातात समलैंगिक समूहाचा झेंडा घेतल्याचे देवीचे रूप सादर करून हिंदूंचा अपमान करणाऱ्यांना फासावर लटकवायला हवे किंवा गोळ्या घालून ठार मारायला हवे, असे आवाहन करीत कर्नाटकमधील भाजपचे नेते के. एस. ईश्‍वरप्पा यांनी केले. कालीमातेचा अवमान केल्याने चित्रपट निर्मात्या लीना मणीमेकलाई यांच्यावर कठोर कारवाई करण्याचीही मागणी त्यांनी केली. ‘‘काली माता हे आमच्यासाठी श्रद्धेचे केंद्र आहे. ती म्हणजे शक्तीचे रूप आहे. भारतीय संस्कृतीचे ती प्रतीक आहे. अशा काली मातेचे सिगारेट ओढतानाचे पोस्टर प्रकाशित केल्याने देशभरातील हिंदू व्यक्ती संतप्त झाले आहेत. भाजपच्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित महंमद यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याचा जगभरातील मुस्लिम समाज निषेध करीत आहे. त्याचप्रमाणे आमच्या देवदेवतांच्या अपमानाविरोधात आम्हीसुद्धा आवाज उठवू, ’’ असे ईश्‍वरप्पा म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur politics: मोहिते-पाटील पिता-पुत्रांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट; साेलापूर जिल्ह्यात नव्या समीकरणांची शक्यता!

Women writers and kitchen representation in literature : स्वयंपाकघरातील अनुभवांचे साहित्यिक दर्शन: स्त्री लेखिकांची भूमिका

Ahilyanagar News: अहिल्यानगरमध्ये महापौरपदाच्या आरक्षणाची प्रतीक्षा; इच्छुकांची फिल्डिंग, ‘स्वीकृत’साठीही मोर्चेबांधणी, पुढील आठवड्यात हालचाली!

Solapur Accident:भाविकांवर काळाचा घाला! भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू, दाेन महिला जखमी; सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील घटना..

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 18 जानेवारी 2026

SCROLL FOR NEXT