Kailash Vijayvargiya and Nitish Kumar News Kailash Vijayvargiya and Nitish Kumar News
देश

‘ते’ विधान माझे नव्हे तर परदेशी मित्राचे; विजयवर्गीय अजब स्पष्टीकरण

ते वादग्रस्त विधान त्यांचे नसून परदेशात राहणाऱ्या मित्राचे

सकाळ डिजिटल टीम

Kailash Vijayvargiya and Nitish Kumar News इंदूर : परदेशातील मुली जसे प्रियकर बदलतात तसे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे सरकार बदलतात, असे वादग्रस्त विधान भाजपचे सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांनी केले होते. यामुळे ते विरोधकांच्या निशान्यावर आले होते. आता त्यांनी याबाबद स्पष्टिकरण दिले आहे. ‘ते वादग्रस्त विधान त्यांचे नसून परदेशात राहणाऱ्या मित्राचे आहे. ते आणि त्यांचा पक्ष महिला शक्तीचा आदर करतो’, असे विजवर्गीय म्हणाले.

२१ दिवसांच्या यूएस दौऱ्यावरून आपल्या मूळ गावी इंदूरला परतल्यानंतर विजयवर्गीय यांनी गुरुवारी पत्रकारांना सांगितले की, ‘ज्या दिवशी बिहारचे सरकार बदलले, मी परदेशात होतो. या प्रकरणात परदेशातील एका व्यक्तीने मला सांगितले की त्यांच्याकडे मुली कधीही बॉयफ्रेंड बदलतात.’ त्यांच्या मुद्द्यावर भाजपचे सरचिटणीस पुढे हसले आणि म्हणाले, ‘त्या परदेशी व्यक्तीने मला सांगितले की बिहारच्या मुख्यमंत्र्यांचीसुद्धा अशीच परिस्थिती आहे की त्यांनी कधी कोणाशी हस्तांदोलन करावे आणि केव्हा सोडावे.’

नितीश कुमार यांनी नुकताच भाजपशी संबंध तोडून राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. यानंतर त्यांनी पुन्हा एकदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि सात पक्षांच्या आमदारांच्या पाठिंब्याने नवीन सरकार स्थापन केले. या राजकीय घडामोडीबाबत विजयवर्गीय यांच्या वक्तव्यावर जनता दल (संयुक्त), राष्ट्रीय जनता दल, काँग्रेस आणि समाजवादी पक्षातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'शिवाजीनगर मेट्रो' स्थानकाचे नाव बदलण्यावरून वाद; फडणवीसांचा तीव्र विरोध, कर्नाटकचे CM म्हणाले, 'आम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे...'

Shivaji University : शिवाजी विद्यापीठाच्या सत्तर टक्के प्रश्नपत्रिका ‘ऑनलाईन सेट’, डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर

Chhagan Bhujbal : ‘ओबीसीतूनच आरक्षण हवे, तर इतर सर्व आरक्षण सोडणार का?’ भुजबळांचे आव्हान

Latest Marathi News Updates : विंचूर उपबाजार आवारात कांद्याला कमी भाव, संतप्त शेतकऱ्यांचा रस्ता रोको आंदोलन

वरिष्ठ गाढवाला घोडा म्हणाले तर तुम्हीही घोडाच म्हणा; सरकारी कामाबाबत गडकरींचं विधान

SCROLL FOR NEXT