Brijbhushan Singh Esakal
देश

Brijbhushan Singh : ...तर ब्रिजभूषण सिंह काँग्रेसमध्ये दिसले असते, सोनिया गांधींची होती संमती; स्वतःच सांगितला किस्सा

''मी तुम्हाला आज एवढा चांगाला का वाटायला लागलो. त्यावर ते मोठे नेते म्हणाले, सगळ्यांना माहिती आहे जर तुम्ही काँग्रेसमध्ये आलात तर उत्तर प्रदेशात काँग्रेस मजबूत होईल.. पण मी काँग्रेसची ऑफर फेटाळली.''

संतोष कानडे

Loksabha election 2024 : खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी काँग्रेसच्या संदर्भाने एक मोठा खुलासा केला आहे. त्यांनी दावा केला की, काँग्रेसच्या एका मोठ्या नेत्याने माझ्याशी संपर्क केला होता. केसरगंज लोकसभा मतदारसंघातून आघाडीकडून तिकीट देण्याची ऑफर त्यांनी दिली होती.

त्यावर ब्रिजभूषण सिंह यांनी त्या नेत्याला म्हटलं की, तुम्ही काँग्रेसमध्ये येण्याची ऑफर देताय पण माझ्याविरोधात आंदोलनाला बसलेलं प्रकरण संपलं का, तुमच्या मॅडमसोबत बोलणी झाली का.. त्यावर त्या मोठ्या नेत्याने सगळी बोलणी झाल्याचं म्हटलं.

ब्रिजभूषण पुढे सांगतात- मी तुम्हाला आज एवढा चांगाला का वाटायला लागलो. त्यावर ते मोठे नेते म्हणाले, सगळ्यांना माहिती आहे जर तुम्ही काँग्रेसमध्ये आलात तर उत्तर प्रदेशात काँग्रेस मजबूत होईल.. पण मी काँग्रेसची ऑफर फेटाळली, असं ब्रिजभूषण म्हणतात.

ब्रिजभूषण सिंह पुढे म्हणाले की, केसरगंजचे लोक रागात आहेत. मागच्या दीड वर्षांपासून मी षड्यंत्राचा शिकार झालो आहेत. त्यामुळे बस्ती, देवीपाटण, अयोध्या या भागात लोक संतप्त आहेत. हाच राग लोक मतदानातून व्यक्त करणार आहेत.

आपल्या राजकीय भविष्याबद्दल ब्रिजभूषण म्हणाले की, तेच होणार जे प्रभू श्रीराम ठरवतील. मी सहा टर्म खासदार आहे. एकवेळ माझी पत्नी खासदार होती, माझा मुलगा आमदार आहे. दुसरा मुलगा खासदार होईल, मी जनतेची सेवा करतच राहणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

खुशखबर! विदर्भात अखेर मॉन्सून दाखल; दहा वर्षांत दुसऱ्यांदा उशिरा आगमन, येलो अलर्ट जारी

Manmad Crime : मनमाडमध्ये पहाटे दुहेरी हत्याकांड; महामार्गालगत झोपलेल्या दोघांना दगडाने ठेचले

Pune District Yellow Alert : पुणे जिल्ह्याला पुढील चार दिवस ‘येलो’ अलर्ट; कमाल तापमानात लक्षणीय घट

Vilas Ghule प्रकरण पेटलं! बीडमध्ये गाड्यांची तोडफोड, नेमकं काय घडलं?

पुन्हा बदली? तुकाराम मुंढेंना पालक सचिव पदावरून हटवले, कुणाची वर्णी?

SCROLL FOR NEXT