Kalicharan Facebook/@kalicharan
देश

कालीचरणवर देशद्रोहाचा गुन्हा

Kalicharan Arrest : कालीचरणला आज सकाळी खजुराहोमधून अटक करण्यात आली.

सुधीर काकडे

कथित धर्मगुरू कालीचरण महाराज (Kalicharan Maharaj) याने काही दिवसांपूर्वी केलेल्या वक्तव्यानंतर आज रायपुर पोलिसांनी त्याला मध्यप्रदेशच्या खजूराहोमधून अटक केली. कालीचरण याने काही दिवसांपूर्वी धर्म संसदेत महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांच्याबद्दल अपशब्द वापरत, त्यांची हत्या करणाऱ्या नाथूराम गोडसेला (Nathuram Godse) नमस्कार करतो असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. या प्रकरणात आता छत्तीसगड पोलिसांनी कालीचरणवर देशद्रोहाचा गुन्हा (Treason Case Against Kalicharan) सुद्धा दाखल केला आहे. कालीचरणने महात्मा गांधींवर टीका करताना भाषेची मर्यादा ओलांडत अपशब्दांचा वापर केला होता. या घटनेनंतर देशभरातून त्यांच्यावर कारवाईची मागणी होत होती.

कालीचरणवर भडकाऊ भाषण केल्याप्रकरणी अनेक ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले होते. छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये एका संघटनेने आयोजित केलेल्या धर्म संसदेत धर्मगुरू कालीचरण महाराज याने महात्मा गांधींबद्दल अपशब्द वापरत, त्यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेंचं समर्थन केलं होतं. कालीचरणवर भारतीय दंड संहितेच्या कलम ५०५ (२) आणि २९४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आता त्यात देशद्रोहाच्या कलमाचा देखील समावेश करण्यात आला आहे.

पुण्यातही गुन्हा दाखल...

पुणे पोलिसांकडून देखील कालीचरणवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे पोलिसांनी (Pune Police) वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या दुसऱ्या एका प्रकऱणात कालीचरणवर गुन्हा दाखल केला आहे. कालीचरण आणि मिलींद एकबोटे यांच्याविरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. खडकमाळ पोलीस स्टेशनमध्ये दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी दोन दिवसांपूर्वी केकेलं वक्तव्य भोवलं असून, याआधी 2 ठिकाणी तक्रारी दाखल झाल्या आहेत.19 डिसेंबरला नातूबागेतील अफझलखानाचा आनंदोत्सव साजरा कऱण्यासाठी कालीचरण आला होता. या प्रकरणात कलम 297, 298 आणि 34 अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Best Election Results: ठाकरे ब्रँडला एकटे प्रसाद लाड कसे ठरले वरचढ? मुंबईतल्या 'बेस्ट'च्या निवडणुकीचा निकाल

Stock Market Closing: शेअर बाजार 3 आठवड्यांच्या उच्चांकावर बंद; आयटी आणि एफएमसीजीमध्ये मोठी वाढ

बॉलिवूडचा एक असा खलनायक ज्याच्यामुळे अमिताभ बच्चन झाले सुपरस्टार ! त्याचा मृत्यू अखेरपर्यंत रहस्यच राहिला

Who Is Shashank Rao : बेस्ट निवडणुकीत ठाकरे बंधुंना शह देणारे शशांक राव कोण? कशी केली कमाल?

Rain-Maharashtra Latest Live News Update: नांदेडमध्ये पुरामुळे लाखो हेक्टर वरील शेती पिकांचे नुकसान

SCROLL FOR NEXT