मध्य प्रदेशचे कृषी मंत्री आणि भाजप नेते कमल पटेल Sakal
देश

मोदी हे अवतारी पुरुष; देशाचे नैराश्‍य नष्ट करणार - कमल पटेल

नैराश्‍याचे वातावरण दूर करण्यासाठीच नरेंद्र मोदी यांनी जन्म घेतला असून भगवान राम आणि भगवान श्रीकृष्णाप्रमाणेच ते देवाचे अवतार आहेत

सकाळ वृत्तसेवा

भोपाळ : नैराश्‍याचे वातावरण दूर करण्यासाठीच नरेंद्र मोदी यांनी जन्म घेतला असून भगवान राम आणि भगवान श्रीकृष्णाप्रमाणेच ते देवाचे अवतार आहेत, असे विधान मध्य प्रदेशचे कृषी मंत्री आणि भाजप नेते कमल पटेल यांनी आज केले आहे. काँग्रेसने केलेले अत्याचार, भ्रष्टाचार आणि देशातील संस्कृतीचे अध:पतन झाल्याने देशात नैराश्‍याचे वातावरण निर्माण झाल्याचा दावा पटेल यांनी केला. (Narendra Modi)

पत्रकारांशी बोलताना कमल पटेल म्हणाले की, ‘देशाला विश्‍वगुरु बनविण्याच्या मार्गावर नेणे, भ्रष्टाचारावर नियंत्रण मिळविणे अणि समाजाचे कल्याण करणे या गोष्टी सामान्य व्यक्तीला करता येण्यासारख्या नाहीत. भारतावर ज्या ज्या वेळी संकट येते आणि अनाचार वाढतो, त्यावेळी आपल्या धर्मात असे म्हटले आहे की, देवच मानवाच्या रुपात अवतार घेतो.

भगवान श्रीरामाने मानवी रुपात येत रावणाचा वध केला आणि रामराज्य स्थापन केले. कंसाचे अत्याचार वाढले त्यावेळी कृष्णाने जन्म घेत सामान्य लोकांची त्रासातून सुटका केली. त्याच प्रमाणे काँग्रेसकडून अत्याचार, भ्रष्टाचार, जातीवाद वाढला आणि देशाची संस्कृती नष्ट होऊन सर्वत्र नैराश्‍याचे वातावरण निर्माण झाले असताना ते सर्व नष्ट करण्यासाठी नरेंद्र मोदींचा जन्म झाला आहे.’

कमल पटेल यांनी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्येही अशाच प्रकारचे विधान केले होते. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान हे तंट्या भिल्ल प्रसिद्ध आदिवासी नेत्याचे अवतार आहेत, असे पटेल म्हणाले होते. तंट्या भिल्ल यांना आदिवासी साहित्यामध्ये भारतीय ‘रॉबिनहूड’ असे संबोधले गेले आहे.

''सामान्य लोकांना अशक्य असलेली कामे मोदींनी करून दाखविली आहेत. ही कामे गेल्या साठ वर्षांतही होऊ शकली असती. त्यामुळेच पंतप्रधान मोदी हे अवतारी पुरुष आहेत. ते देवाचा अवतार आहेत.''

- कमल पटेल, भाजप नेते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Drugs Crackdown: पुणे पोलिसांचा ड्रग्ज तस्करांना दणका! 162 गुन्हे, 283 आरोपी अटकेत; 11.28 कोटींचा मुद्देमाल जप्त

IND vs PAK : भारत-पाकिस्तान २ ऑगस्टला क्रिकेटच्या मैदानावर भिडणार; हा सामना किती वाजता अन् कुठे पाहता येणार?

ITR Date Extension 2026: आज ITR भरण्याची अंतिम मुदत! डेडलाइन वाढणार? 'या' करदात्यांना मात्र आधीच दिलासा

Monsoon Cough & Cold: पावसाळ्यातल्या सर्दी-खोकल्यापासून झटपट आराम हवाय? मग लगेच करा 'हे' घरगुती आयुर्वेदिक उपाय

Latest Marathi News Live Update : कोल्हापूर धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस

SCROLL FOR NEXT