देश

Kangana Ranaut : ज्या आजींमुळे कंगनाला कानशिलात बसली त्या मोहिंदर कौर नेमक्या कोण? काय आहे प्रकरण?

चार वर्षांपूर्वी देशामध्ये शेतकरी आंदोलन उसळलं होतं. २०२० पेटलेल्या या आंदोलनात पोस्टर लेडी म्हणून सोशल मीडियात फेमस झालेल्या एका वृद्ध महिलेच्या बाबतीच कंगना यांनी वादग्रस्त विधान केलं होतं. त्या वृद्ध महिलेचं नाव मोहिंदर कौर असं होतं. कमरेतून वाकून गेलेल्या असतानाही त्या शेतकरी आंदोलनाचा झेंडा घेऊन पायी चालत होत्या. त्यामुळे त्या आजी व्हायरल झाल्या होत्या.

संतोष कानडे

नवी दिल्लीः नुकत्याच हाती आलेल्या लोकसभा निवडणुकीत मंडी लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या कंगना रणौत यांना चंदीगड विमानतळावर एका वेगळ्याच प्रकाराला सामोरं जावं लागलं. विमानतळावर सुरक्षेसाठी तैनात असलेल्या महिला सीआयएसएफ जवानाने कंगनाच्या कानशिलात लगावली. शेतकरी आंदोलनादरम्यान कंगनाने केलेल्या विधानामुळे आपण असं केल्याचं त्या महिला रक्षकाने सांगितलं आहे.

शेतकरी आंदोलनात नेमकं काय झालं?

चार वर्षांपूर्वी देशामध्ये शेतकरी आंदोलन उसळलं होतं. २०२० पेटलेल्या या आंदोलनात पोस्टर लेडी म्हणून सोशल मीडियात फेमस झालेल्या एका वृद्ध महिलेच्या बाबतीच कंगना यांनी वादग्रस्त विधान केलं होतं. त्या वृद्ध महिलेचं नाव मोहिंदर कौर असं होतं. कमरेतून वाकून गेलेल्या असतानाही त्या शेतकरी आंदोलनाचा झेंडा घेऊन पायी चालत होत्या. त्यामुळे त्या आजी व्हायरल झाल्या होत्या.

कंगनांचं नेमकं विधान काय?

मोहिंदर कौर यांचा फोटो ट्वीट करत कंगना रणौत यांनी त्यांची तुलना सीएए आंदोलनात सहभागी झालेल्या ८२ वर्षीय वृद्ध महिला बिल्किस बानोशी केली होती. तिने ट्वीट करत म्हटलं होतं की, हो..हो या त्याच आजी आहेत ज्यांना टाईम मॅगझिने शंभर सगळ्यात प्रभावशाली व्यक्तींमध्ये सहभागी केलं होतं.. आणि ह्या शंभर रुपयांमध्ये उपलब्ध आहेत. त्यानंतर कंगना यांनी हे ट्वीट डिलिट केलं होतं.

मोहिंदर कौर नेमक्या कोण?

२०२० मध्ये शेतकरी आंदोलनाचा चेहरा बनलेल्या मोहिंदर कौर ह्या पंजाबमधल्या बठिंडा येथील आहेत. कृषी कायद्याच्या विरोधात सुरु आलेल्या आंदोलनात त्या थकता चालत होत्या. मोहिंदर कौर यांच्याकडे १२ एकर जमीन आहे. त्यांनी केवळ आंदोलनात सहभाग घेतला नाही तर त्यासाठी आर्थिक मदतदेखील केली होती.

एवढं वय होऊनही मोहिंदर कौर ह्या शेती करतात. सोशल मीडियात त्यांची चर्चा झाल्यामुळे शेतकरी आंदोलनामध्ये आणखी चैतन्य निर्माण झालं होतं. त्यांच्यासोबत आणखी एक आजी चर्चेत आल्या होत्या. त्यांचं नाव जनगीर कौर, याही पंजाबमधल्या बरनाला इथल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! ३३ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार अतिवृष्टी, महापुराची नुकसान भरपाई; सर्व जिल्ह्यांचे पंचनामे अहवाल सादर

Prashant Kishor on Bihar Election: अखेर प्रशांत किशोर यांनी निवडणूक न लढवण्यामागचं नेमकं कारण सांगितलं, म्हणाले..

पोलिस आयुक्तांचा मोठा निर्णय! सोलापूर शहरात रात्री १२ ते पहाटे ५ पर्यंत नाकाबंदी; प्रत्येक पोलिस ठाण्याअंतर्गत एक विशेष पथक

Baidpura Violence : गोमांस विक्रीच्या संशयावरून दोन गट आमनेसामने; दोन्ही गटाकडून तक्रारी, अदखलप्राप्त गुन्हे दाखल

Pune Traffic : पुणे-सातारा बाह्यवळण मार्गावर दिवाळीच्या गर्दीत वाहतूक कोंडीचा कहर

SCROLL FOR NEXT