देश

कन्हैया कुमार, जिग्नेश मेवाणी यांचा 'या' दिवशी काँग्रेस प्रवेश निश्चित

गेल्या अनेक दिवसांपासून या दोघांच्या काँग्रेस प्रवेशाच्या चर्चा सुरु होत्या

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : जेएनयूचा माजी विद्यार्थी नेता तसेच कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचा सदस्य कन्हैया कुमार तसेच गुजरातचे अपक्ष आमदार जिग्नेश मेवाणी यांचा काँग्रेस प्रवेश निश्चित झाला आहे. येत्या २८ सप्टेंबर रोजी त्यांचा पक्ष प्रवेश होईल, अशी माहिती एएनआयने सुत्रांच्या हवाल्यानं दिली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या दोघांची काँग्रेस प्रवेशाची चर्चा सुरु होती.

कन्हैया कुमारने काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली होती. त्यांच्या या भेटीमुळे कन्हैया काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु झाल्या होत्या. पण जिग्नेश मेवाणी यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय अचानक घेतल्याचं यामुळे दिसून आलं आहे. २०१९ साली कन्हैया कुमारनं बिहारमधील बेगुसराय मतदार संघातून भाजपविरोधात निवडणूक लढवली होती.

दरम्यान, या महिन्याच्या सुरुवातीला कन्हैया कुमारने सीपीआयच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला उपस्थिती लावली होती. कन्हैय्या या कार्यक्रमात बोलला आणि चर्चेत देखील सहभाग घेतला होता, अशी माहिती सीपीआय नेते डी. राजा यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission Update: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! दसऱ्यानंतर मुंबईत महत्त्वाची बैठक; पगारवाढ आणि DAबाबत काय चर्चा होणार?

VIDEO: दुष्काळाच्या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्री गैरहजर; महायुतीत नाराजीनाट्याची चर्चा

Masur Fox Attack: मसूरमध्ये कोल्ह्यांची दहशत! वृद्धासह चिमुकली, महिला आणि शेतकऱ्यावर हल्ले

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर कारखाना निवडणुकीत सुनेत्रा पवार यांचे खाते उघडले; संग्राम सोरटे विजयी

Truck Fire: राष्ट्रीय महामार्गावर धावत्या ट्रकला आग

SCROLL FOR NEXT