Kanhaiya Kumar  
देश

Video: कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला; फुलांचा हार घालायला आला अन्...; व्हिडिओ व्हायरल

video viral: उत्तर पूर्व दिल्लीचे काँग्रेसचे उमेदवार कन्हैया कुमार यांना मारहाण झाल्याचं समोर आलं आहे

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- उत्तर पूर्व दिल्लीचे काँग्रेसचे उमेदवार कन्हैया कुमार यांना मारहाण झाल्याचं समोर आलं आहे. यासंदर्भातील व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओमध्ये दिसतंय की, एक व्यक्ती कन्हैया यांना हार घालण्यासाठी पुढे आला. त्याने कन्हैया यांना हार घातला अन् लगेच त्यांना चापट लगावली.

कन्हैया कुमार हे आपल्या मतदारसंघात प्रचार करत होते. त्यावेळी त्यांच्यावर हा हल्ला झाला आहे. व्हिडिओमध्ये ऐकायला मिळतंय की, एकजण म्हणतो 'कन्हैया अब पिटने वाला है'. त्यानंतर एक काळ्या टी-शर्टमधील व्यक्ती हातात फुलांचा हार घेऊन पुढे येतो. तो कन्हैया यांना हार घालतो आणि त्यांना जोराची चापट लगावतो.

सदर प्रकारानंतर कन्हैया यांचे समर्थक तरुणाला पकडतात आणि त्याला मारहाण करतात. व्हिडिओमध्ये काही लोकांच्या कपड्यावर रक्त देखील दिसत आहे. कन्हैया कुमार यांना काही जखम झाली आहे का? याबाबत अद्याप कळू शकलेलं नाही. मारहाण करणाऱ्या तरुणाची ओळख होऊ शकलेली नाही.

उत्तर पूर्व दिल्लीच्या उस्मानपूर भागातील करतार नगरमध्ये ही घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आम आदमी पक्षाच्या महिला नेत्या छाया शर्मा यांच्यासोबत देखील गैरवर्तन करण्यात आले आहे. त्यांनी यासंदर्भात पोलिसांकडे तक्रार केली आहे.

छाया शर्मा यांनी आपल्या लिखित तक्रारीमध्ये म्हटलंय की, सायंकाळी चार वाजता सत्यनारायण भवन येथील कार्यालयाजवळ एका बैठकीनंतर सात ते आठ लोक आले होते. त्यांच्यापैकी दोघांकडे शस्त्र होती. ते आत आले आणि त्यांनी कन्हैया कुमार यांना हार घालण्याच्या बहाण्याने त्यांना चापट मारली.

छाया शर्मा यांनी दावा केलाय की, त्यांच्यासोबत देखील गैरवर्तन करण्यात आले आहे. त्यांना आणि त्यांच्या पतीला जिवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केलाय. त्या म्हणाल्या की, ३० ते ४० लोकांवर शाई फेकण्यात आली आहे. यात तीन ते चार महिला देखील जखमी झाल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cristiano Ronaldo Record: "नाद करा, पण आमचा कुठं..." ख्रिस्तियानो रोनाल्डो आला अन् मैदान गाजवलं; रेकॉर्ड ब्रेकिंग गोल्स Video Viral

Cristiano Ronaldo Create History: अविश्वसनीय! रोनाल्डोचा विश्वविक्रम; World Cup मध्ये असा पराक्रम करणारा जगातील पहिलाच, मेस्सीचाही विक्रम मोडला, Video

Tanker Mafia : नागरिकांची आर्थिक पिळवणूक! टँकरमाफियांना महापालिकेची फूस; अवाच्या सवा दराने पाण्याची विक्री

Monsoon Update: मान्सूनचा वेग मंदावला! देशातल्या १२ राज्यांतील ३१५ जिल्ह्यांवर दुष्काळाचे भीषण सावट

Tankerman Salman Pathan : गावचा पाणी पुरवठा झाला कमी; अगरवाडगावची तहान भागवतोय ‘टँकरमॅन’ सलमान

SCROLL FOR NEXT