Kanhaiya Kumar Team eSakal
देश

कन्हैय्या कुमार करणार काँग्रेसमध्ये प्रवेश? राहुल गांधींची घेतली भेट

कन्हैया कुमार सीपीआय सोडचिठ्ठी देणार असल्याची शक्यता आहे.

सुधीर काकडे

कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया पक्षाचा नेता कन्हैया कुमार (Kanhaiya Kumar) आणि राहुल गांधी यांच्या (Rahul Gandhi) भेटीबद्दलच्या चर्चांना उधान आलंय. कन्हैया कुमार आता सीपीआय सोडत काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवली जातेय. मंगळवारी झालेल्या या भेटीनंतर आता कन्हैया कुमार काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. कन्हैया कुमार यांनी २०१९ साली भारतीय जनता पक्षाच्या विरोधात बेगुसराय मतदार संघातून निवडणूक लढवली होती.

जेएनयु विद्यापीठाचा माजी विद्यार्थी आणि विद्यार्थीनेता कन्हैया कुमार आता डाव्या विचार धारेच्या पक्षाला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवली जातेय. त्यांच्या निकटवर्तीयांकडून मिळालेल्या माहितीनुसार कन्हैया कुमार यांनी मंगळवारी राहुल गांधींची भेट घेतली त्यानंतर ते लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता आहे, असे इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तामधून समोर आले आहे.

दरम्यान, सीपीआयकडून याबद्दल कुठलीही माहिती नसल्याची प्रतिक्रीय मिळाली आहे. सीपीआय नेते डी राजा यांनी आपण फक्त अशी चर्चा ऐकल्याचे सांगितले आहे. ‘या महिन्याच्या सुरुवातीला कन्हैया कुमार पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलला आणि चर्चेत देखील सहभाग घेतला,’ असे राजा यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pusad Gun Firing : पुसद मध्ये गोळीबार, चाकूहल्ल्यात दोघे जखमी; घटनेने खळबळ

FIFA सामन्यात दिसलेलं 'ग्रीन व्हिसल' नेमकं आहे तरी काय? Pain कमी करणाऱ्या या उपकरणाची जगभर होतेय चर्चा!

Latest Marathi News Update : राज्यासह देशभरात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Khadakwasala Dam : धरण क्षेत्रात यंदा पावसाची मोठी तफावत; सरासरी ९५.८४ टक्के घट, पाणीसाठ्याबाबत चिंता

Land Acquisition : माऊलींच्या पालखीसाठी अवघ्या तीन महिन्यात भूसंपादन; इमारत पाडण्याचे काम सुरू

SCROLL FOR NEXT