kanjhawala case esakal
देश

Kanjhawala Case : तरुणीला फरफटत नेल्याप्रकरणी 11 पोलिस निलंबित; गृह मंत्रालयाने घातलं लक्ष

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्लीः दिल्लीतल्या कंझावला केसमध्ये एका तरुणीला कारखाली १३ किलोमीटर फरफटत नेलं होतं. तिच्या शरीरावरील संपूर्ण कपडे निघाले होते, मांसदेखील खरवडून निघालं होतं. या प्रकरणात केंद्र सरकारने लक्ष घातल्यानंतर ११ पोलिस निलंबित झालेले आहेत.

निलंबित करण्यात आलेले पोलिस कर्मचारी रोहिणी जिल्ह्यातले आहेत. यामध्ये दोन पोलिस सब इन्स्पेक्टर निलंबित झालेले आहेत तर चार असिस्टंट सब इन्स्पेक्टर आणि पाच कॉन्स्टेबल निलंबित करण्यात आलेले आहेत.

घटना घडली त्या दिवशी सहा पीसीआर ड्युटीवर होते. निलंबित पोलिसांनी कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवण्यात आलेला आहे. ज्या रस्त्याने अंजलीला फरफटत नेलं त्या रस्त्यावरील पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलेले आहेत.

काय आहे प्रकरण?

दिल्लीच्या कंझावालामध्ये 1 जानेवारीच्या पहाटे एका तरुणीचा मृतदेह निर्वस्त्र अवस्थेत आढळून आला होता. शरीराचे बरेचसे भाग फरफटत नेल्यानं तुटले होते. पोलिसांच्या दाव्यानुसार ५ तरुण भरधाव वेगानं कार चालवत होते. त्यांनी संबंधित तरुणी स्कूटरवरुन जात असताना तिला धडक दिली. त्यानंतर तिला १३ किमीपर्यंत फरफटत नेलं. ज्यात तिचा मृत्यू झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : कोचिंग क्लास हा शिक्षणापेक्षा धंदा! कॉलेजची फी 20 हजार, क्लासची 1 लाख; राज ठाकरेंचा थेट सवाल

Success Story: जिद्दीला मेहनतीची जोड! अश्विनी मोरे यांची महानिर्मितीत अतिरिक्त कार्यकारी अधिकारीपदी निवड, प्रेरणादायी प्रवास

Abhijeet Dipke Claim : सीजेपीवर पाळत ठेवण्यासाठी सरकार अमेरिकन कंपन्यांची मदत घेतंय? अभिजीत दिपकेचा खळबळजनक दावा

Marathi News Live Updates : मोहन भागवत यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मोदी सरकारलाच संदेश दिला- संदीप देशपांडे

Kolhapur Municipal Corporation Job : कोल्हापूर महापालिकेत मेगा भरती! 4,445 पदांच्या आकृतिबंधास मान्यता; उमेदवारांसाठी मोठी संधी, 700 पदे भरण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT