Kanpur Violence Case Diary esakal
देश

दगडफेक करणाऱ्यांना 1000, तर बॉम्बस्फोट करणाऱ्यांना 5000 रुपये.. जाणून घ्या हिंसाचार कसा झाला?

अल्पवयीन मुलांना हिंसाचार आणि दगडफेक करण्यासाठी ठेवण्यात आलं होतं.

सकाळ डिजिटल टीम

अल्पवयीन मुलांना हिंसाचार आणि दगडफेक करण्यासाठी ठेवण्यात आलं होतं.

लखनौ : 3 जून 2022 रोजी उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये शुक्रवारच्या नमाजानंतर उसळलेल्या हिंसाचाराबाबत (Kanpur Violence) एसआयटीनं (SIT) मंगळवारी कोर्टात केस डायरी दाखल केली. त्यावर कोर्टात झालेल्या सुनावणीदरम्यान अनेक खुलासे झाले असून त्यात दगडफेकीपासून ते बॉम्बस्फोटापर्यंतचे दर बदमाशांकडून ठरवण्यात आल्याचं समोर आलंय. या प्रकरणातील केस डायरी सरकारी वकील दिनेश अग्रवाल (Dinesh Agarwal) यांनी दाखल केली होती.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, कोर्टात दाखल केलेल्या एसआयटीच्या केस डायरीमध्ये (Kanpur Violence Case Diary) कानपूरमधील हिंसाचार सुनियोजित होता, यामध्ये प्रत्येक व्यक्तीसाठी वित्तापासून (पैसे) वेगळी जबाबदारी निश्चित करण्यात आली होती. हिंसाचार करणाऱ्यांना कसा मोबदला द्यायचा आणि त्यांना काम कसं करायला लावायचं आणि त्यासाठी किती पैसे द्यायचे, याचा दरही आधीच ठरवून दिला जात होता. एसआयटीच्या केस डायरीमध्ये प्रत्येक दगडफेकीला कथितपणे 500-1,000 रुपये आणि दंगलीत पेट्रोल बॉम्ब फेकणाऱ्यांना आणि हातगाडीवर दगड फेकणाऱ्यांना 5000 रुपये देण्यात आल्याचा उल्लेख आहे. यासोबतच एसआयटीच्या डायरीत असाही दावा करण्यात आलाय की, जमाव वाढवण्यासाठी कट रचणाऱ्यांनी केलेल्या हिंसाचारात तरुण आणि अल्पवयीन सहभागी होते. अल्पवयीन मुलांना केवळ हिंसाचार आणि दगडफेक करण्यासाठी ठेवण्यात आलं होतं.

त्याचवेळी बिल्डर हाजी वासी आणि हयात जफर हाश्मी यांनी हिंसाचाराच्या निधीसाठी मालमत्ता विकून एक कोटी 30 लाख रुपये गोळा केल्याचंही पोलिस तपासात निष्पन्न झालंय. त्यामुळं दगडफेक करणाऱ्यांना 1000 ते 5000 रुपये मानधन देण्यात आलं. हाजी वासीनं हिंसाचाराच्या एक दिवस आधी 34 लाख रुपयांच्या दोन मालमत्ता विकल्याचं एसआयटीला समजलं आहे. त्याचाही तपास पोलीस करत आहेत. या सर्व मालमत्तांची चौकशी करण्यासाठी पोलिसांनी संबंधित विभागाशी संपर्क साधून अहवाल मागवलाय. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हाजी वाशीचा मॅनेजर अफजलनं हिंसा भडकवण्यासाठी संपूर्ण टीम तयार केली होती आणि बदमाशांना 10 लाख रुपये आगाऊ दिले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Citizenship: जन्मसिद्ध नागरिकत्वावर ट्रम्प यांचा डाव फसला! आदेशाला अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा ब्रेक; बर्थराइट सिटिझनशिप कायम

भाजपात अंतर्गत कुरघोडीचे राजकारण? नवनियुक्त शहराध्यक्षांच्या नियुक्तीला २४ तासांतच स्थगिती, नेमकं काय घडतंय?

Balen Shah News: नेपाळमध्ये नवा राजकीय वाद! बालेन शाहांच्या पक्षात ३५ हजार अल्पवयीन सदस्य? अडचणीत वाढ होणार

IND vs ENG 1st T20I: इंग्लंडने पहिला डाव टाकला; खचलेल्या टीम इंडियाला टक्कर देणारी प्लेइंग XI जाहीर; जोफ्रा नसला तरी...

Arabian Sea Monsoon : अरबी समुद्रात मॉन्सून तीव्र; ३ ते ६ जुलैदरम्यान मुंबई-उत्तर कोकणात अतिमुसळधार पाऊस, विदर्भातील जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

SCROLL FOR NEXT