Kanyadan Ceremony Esakal
देश

Kanyadan: वैध हिंदू विवाहासाठी कन्यादानाची नव्हे तर 'या' गोष्टीची गरज, वाचा हायकोर्ट असं का म्हणाले?

Matrimonial Disputes: वैवाहिक वादाशी संबंधित सुरू असलेल्या फौजदारी प्रकरणात दोन साक्षीदारांना पुन्हा न्यायलयात बोलवण्याची मागणी केली होती.

आशुतोष मसगौंडे

अलाहबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठाने एक ऐतिहासिक निर्णय देताना सांगितले की, हिंदू विवाह कायद्यानुसार वैध विवाहासाठी कन्यादानाच्या विधीची गरज नाही.

न्यायाधीश सुभाष विद्यार्थी यांच्या खंडपीठाने सांगितले की, वैध हिंदू विवाहासाठी कन्यादान विधीची गरज नाही. वैध विवाहासाठी फक्त सप्तपदी पुसेशी आहे.

या टिप्पणीसह न्यायालयाने सक्षीदारांना पुन्हा न्यायालयात बोलवण्याची पुनरीक्षण याचिका फेटाळली.

न्यायालयाने आशुतोष यादव नामक व्यक्तीच्या याचिकेवर सुनावणी करताना हा निर्णय दिला आहे. या व्यक्तीने आपल्या सासरच्यांनी दाखल केलेल्या एका गुन्ह्यात लखनऊच्या अतिरिक्त सत्र न्यायाधीशांनी दिलेल्या आदेशाच्या विरोधात उच्च न्यायलयात आव्हान दिले होते.

सत्र न्यायालयाने सुनावणीवेळी म्हटले होते की, वैध हिंदू विवाहासाठी कन्यादान समारोह अनिवार्य आहे. जो विवाहावेळी पार पडले नाही. यावरुन वाद निर्माण झाला होता.

पुढे अलाहबाद उच्च न्यायालयाने हिंदू विवाह कायद्यानुसार वैध विवाहासाठी फक्त सप्तपदी पुरेसा आहे, त्यामुळे कन्यादान आवश्यक नाही.

दरम्यान आशुतोष यादव यांची पुनरीक्षण याचिका फेटाळताना उच्च न्यायालयाचे न्यायाधीश सुभाष विद्यार्थी यांनी म्हटले की, हिंदू विवाह कायद्यानुसार वैध विवाहासाठी 'सप्तपदी' म्हणजेच सात फेरे पुरेसे आहेत. त्यासाठी कन्यादानाच्या समोरोहाची गरज नाही.

वैवाहिक वादाशी संबंधित सुरू असलेल्या फौजदारी प्रकरणात दोन साक्षीदारांना पुन्हा न्यायलयात बोलवण्याची मागणी केली होती. जी न्यायालयाने फेटाळली होती. त्याच्याविरोधात याचिकाकर्त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

परिणामी, न्यायालयाने असा निष्कर्ष काढला की कन्यादान विधीच्या संदर्भात फिर्यादीच्या साक्षीदारांची पुनर्तपासणी करणे खटल्याच्या निकालासाठी आवश्यक नव्हते. म्हणूनच न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाचा आदेश कायम ठेवत फेरविचार याचिका फेटाळून लावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT