देश

नारायण राणेंसह 'या' नेत्यालाही केंद्रीय मंत्रिपद

नामदेव कुंभार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारच्या मंत्रिमंडळाचा बुधवारी विस्तार होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात महाराष्ट्राच्या पदरी दोन मंत्रिपदं जवळपास निश्चित झाली आहे. खासदार नारायण राणे आणि कपिल पाटील यांना दिल्लीवरुन तातडीनं फोन आल्याची माहिती मिळाली आहे.

सध्या महाराष्ट्रातून नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर, पीयूष गोयल हे तीन केंद्रीय मंत्रिपद सांभाळत आहेत. तसेच, रामदास आठवले, संजय धोत्रे आणि रावसाहेब दानवे हे तिघे राज्यमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळत आहेत. सध्या महाराष्ट्रात सहा केंद्रीय मंत्रिपदं आहेत. यामध्ये आणखी दोन मंत्रिपदाची भर पडणार हे निश्चित झालं आहे. नारायण राणे आणि कपिल पाटील यांना केंद्रीय मंत्रिपद मिळणार की राज्यमंत्रिपदाची जबाबदारी, हे मंत्रिमंडळ विस्तारानंतरच समोर येईल.

राणे आणि पाटील यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्यास महाराष्ट्रात शिवसेनेविरोधात भाजप अधिक आक्रमक होण्याची शक्यता मानली जाते. कपिल पाटील यांच्यामुळे आगरी समाजाला मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व मिळू शकेल. आगामी काळात होणाऱ्या मुंबई आणि केडीएमसी महानगरपालिकेच्या दृष्टीने या दोन नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान दिल्याचं बोललं जात आहे. नंदुरबारच्या खासदार हिना गावित, माढाचे खासदार रणजीत नाईक-निंबाळकर, बीडच्या खासदार प्रीतम मुंडे आणि राज्यसभेचे खासदार भागवत कराड यांच्याही नावाची चर्चा होत आहे. मात्र, यांना अद्याप दिल्लीवरुन बोलवणं आल्याची कोणतीही माहिती समोर आली नाही. किंवा यापैकी कोणताही नेता दिल्लीत दाखल झाल्याचं वृत्त नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI: शुभमन गिलच्या कॅप्टन्सीबद्दल विराट कोहलीने स्पष्टच सांगितलं, 'अजूनही शिकतोय, तो दीर्घकाळ...'

NEET 2026: 'स्लो लर्नर' ते ऑल इंडिया रँक 1; सोडवले 10 हजारांपेक्षा जास्त MCQ! पाहा NEET PG टॉपरची भन्नाट यशोगाथा...

होमस्टेमध्ये २२ वर्षीय निमिषाचा मध्यरात्री मृत्यू, बॉयफ्रेंड आसिफला पोलिसांनी घेतलं ताब्यात

Latest Marathi News Live Update : भंडाऱ्यात खासगी रुग्णालय आणि पॅथॉलॉजीवर कारवाई

Mumbai-Pune Accident: मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर तिहेरी अपघात; कोल्हापुरच्या दोन तरुणांचा मृत्यू, एक गंभीर Video Viral

SCROLL FOR NEXT