Kapil Sibal
Kapil Sibal Sakal
देश

कपिल सिब्बलांचा काँग्रेसला रामराम; सपाकडून राज्यसभेची उमेदवारी दाखल

सकाळ डिजिटल टीम

लखनऊ : काँग्रेसचे माजी नेते कपिल सिब्बल (Kapil Sibal) यांनी 16 मे रोजी पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर आज त्यांनी समाजवादी पक्षाकडून (Samajwadi Party) राज्यसभेसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सिब्बल यांनी उत्तर प्रदेशमधील पक्षाच्या मुख्यालयात पक्षप्रमुख अखिलेश यादव यांच्या उपस्थितीत समाजवादी पक्षाकडून राज्यसभेसाठी उमेदवारी दाखल केला आहे. (Kapil Sibal Files Rajya Sabha Nomination With SP Support)

दरम्यान, कपिल सिब्बल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर अखिलेश यादव म्हणाले की, सपाच्या पाठिंब्याने सिब्बल राज्यसभेवर जाणार आहेत. याशिवाय आणखी दोन लोक सभागृहात जाऊ शकतात असे यादव म्हणाले. सिब्बल हे ज्येष्ठ वकील असून, यापूर्वीच्या काळात त्यांनी संसदेत अनेकदा चांगली मते मांडली आहेत. त्यामुळे आम्हाला आशा आहे की, आगामी काळात ते समाजवादी पक्षाची आणि स्वत:ची मते सभागृहात मांडतील.

राज्यसभा निवडणूक : यूपीमध्ये 11 जागांपैकी भाजपला 7, सपाला 3 जागा
राज्यसभेच्या 11 जागांसाठी 10 जून रोजी निवडणूक होणार आहे. या सदस्यांचा कार्यकाळ 4 जुलै रोजी संपत आहे. यासाठी 24 ते 31 मे या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत. उमेदवारी अर्जांची छाननी 1 जून रोजी होणार असून, 3 जूनपर्यंत उमेदवारी मागे घेता येणार आहे. 10 जून रोजी सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत मतदान पार पडणार असून, सायंकाळी 5 वाजेपासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे.

या 11 जागांपैकी भाजपला सात आणि सपाला तीन जागा मिळणे जवळपास निश्चित आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एका जागेसाठी 36 आमदारांचे मत आवश्यक आहे. भाजप आघाडीकडे 273 आमदार आहेत. अशा स्थितीत त्यांना 7 जागा जिंकण्यास कोणतीही अडचण येणार नाही. सपाचे 125 आमदार आहेत. त्यांना 3 जागा जिंकण्यात काहीच अडचण नाही, मात्र 11 व्या जागेसाठी भाजप आणि सपा या दोघांमध्ये चुरस होऊ शकते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

क्रिकेट विश्वात उडाली मोठी खळबळ! T20 World Cupवर दहशतवादी हल्ल्याचे संकट, पाकिस्तानमधून आली धमकी

ED Raid Video : झारखंडमध्ये ईडीची मोठी कारवाई; अनेक ठिकाणांवर मारली रेड, नोटांचा डोंगर बघून अधिकारीसुद्धा चक्रावले

Share Market Today: शेअर बाजारात नफा कमावण्याची मोठी संधी; आज 'या' 10 शेअर्सवर ठेवा लक्ष

Latest Marathi News Update : नाशिकच्या गंगापूर रोडवरील ICICI बँकेत चोरी

Nashik Crime News : बँकेच्या सेफ्टी लॉकरमधील 5 कोटींचे दागिन्यांवर डल्ला! घरफोडीचा गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT