देश

देशाच्या विकासात संत, मुनींचे योगदान महत्वपूर्ण - नरेंद्र मोदी

संजय खूळ

श्रवणबेळगोळ  - देशाच्या विकासात संत, मुनींचे योगदान महत्वपूर्ण ठरत आहे. धार्मिक प्रवृत्ती जपत त्यांच्याकडून होणारे सामाजिक कार्य अतुलनीय आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथे काढले. 

येथील भगवान बाहुबली मूर्तीवरील महामस्तकाभिषेक सोहळ्या निमित्त आयोजित कार्यक्रमात श्री  मोदी बोलत होते.  पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते हॉस्पटिलचा लोकार्पण सोहळा व विंध्यगिरी पर्वतावर जाण्यासाठी तिसऱ्या मार्गाचे उद्घाटन मोदी यांच्या हस्ते झाले. यावेळी केंद्रीय मंत्री पियुष गोयल, केंद्रिय मंत्री अनंतकुमार, कर्नाटकचे राज्यपाल वजुभाई वल्ला, महोत्सव समितीच्या अध्यक्षा सरिता जैन उपस्थित होते.  

स्वागत हसनचे पालकमंत्री ए. मंजू यांनी केले. महोत्सवसाठी मदत करणाऱ्या सर्व घटकांबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. जगदगुरु चारुकीर्ती भट्टारक महाराज यांचा श्री. मोदी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

आज सामान्य कुटुंबातील एखाद्या व्यक्तीस झालेला आजार दोन पिढयांना कर्जबाजारी करत आहे. त्यामुळे शासनाने आयुष्यमान भारत योजने अंतर्गत पाच लाखाची मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. 

- नरेंद्र मोदी, पंतप्रधान

जगदगुरु चारुकीर्ती भट्टारक महाराज म्हणाले, श्रवणबेळगोळच्या विकासासाठी राज्य आणि केंद्र शासनाने चांगली मदत केली आहे. पुरातत्व खात्याच्या परवानगीसाठी केंद्रीय मंत्री महेश शर्मा यांची मोठी मदत मिळाली. श्री शर्मा यांनी नवीन मार्गाचे उद्घाटन पंतप्रधान यांच्या हस्ते व्हावी. अशी इच्छा व्यक्त केली होती. या मार्गामुळे पहाडावर जाताना होणारी गर्दी कमी झाली तसेच संपूर्ण पहाडाभोवती संरक्षण कंपाउंड उभारल्याने अधिक सुरक्षितता निर्माण झाली आहे. जागतिक स्तरावर आपल्या कार्याने वेगळी प्रतिमा निर्माण करणारे पंतप्रधान श्री मोदी हे या महोत्सवाला उपस्थित राहिले हा योग सुवर्णाक्षरांनी लिहिला जाणार आहे. ज्या प्रमाणे भगवान बाहुबलीची मूर्ती निर्माण करण्यास चामुंडराया राज़ा यांचे मातेचे मोठे योगदान आहे तसेच या देशाला आदर्श पुत्र  देणाऱ्या पंतप्रधानच्या मातोश्री वंदनीय आहेत. "

पंतप्रधान मोदी म्हणाले, " या महोत्सवाला येता आले आणि देशभरातील अनेक त्यागींचें दर्शन घेता आले हे मी माझे सौभाग्य समजतो. पुरातत्व खात्याच्या सहकार्याने ज्या काही चांगल्या गोष्टी करता येतील, ते करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केले आहेत. साधू आणि संतांनी सामाजिकता जपत आरोग्य , शिक्षण या सह विविध क्षेत्रात करीत असलेले काम उल्लेखनीय आहे. देशात समाज जीवन बदलाची परंपरा आहे. अशा वेळी साधू आणि संत चिंतन, मनन करून अमृतरूपाने माहिती देत असतात. बदलत्या युगात हॉस्पिटल लोकार्पण करण्याचे काम माझ्या हातून झाले हे मी माझे भाग्य समजतो.

दरम्यान महोत्सवच्या तिसऱ्या दिवशी आजी बाहुबली मूर्तीवर १००८ कलशाभिषेक सोहळा पार पडला.

बाहुबली महामस्तकाभिषेकाशी संबंधीत बातम्या व लेख- 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT