Basavaraj Bommai  esakal
देश

Karnataka Election : मुख्यमंत्री बोम्मई 'या' मतदारसंघातून निवडणूक लढवणार; भाजपची यादी आज जाहीर होण्याची शक्यता!

कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आज किंवा उद्या उमेदवारांची यादी जाहीर करू शकतं.

Balkrishna Madhale

2018 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप 104 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला.

Karnataka Assembly Election 2023 : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आज किंवा उद्या उमेदवारांची यादी जाहीर करू शकतं.

भाजपच्या मुख्य निवडणूक समितीच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) म्हणाले, आम्ही सोमवारी पुन्हा एकदा बैठक घेणार आहोत. त्यामुळं आज (सोमवार) किंवा मंगळवारपर्यंत आमची यादी जाहीर करु. तसंच त्यांनी शिग्गांव मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं.

पत्रकारांशी बोलताना बोम्मई म्हणाले, "आम्ही कर्नाटक निवडणुकीच्या यादीवर चर्चा केली आणि कदाचित, आम्ही आज पुन्हा यावर चर्चेला बसणार आहोत. त्यामुळं आज (सोमवार) किंवा दुसऱ्या दिवशी यादी जाहीर केली जाईल. मी शिग्गांव मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे."

रविवारी पक्षाच्या मुख्यालयात पुढील महिन्यात होणाऱ्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी सीईसीच्या बैठकीला भाजपचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजपचे प्रमुख जेपी नड्डा, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी या बैठकीला उपस्थित होते.

2018 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप 104 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला. यात काँग्रेसनं 80 आणि JD(S) नं 37 जागा जिंकल्या. 224 सदस्यीय संख्या असणाऱ्या कर्नाटकात 10 मे रोजी निवडणूक होणार असून विधानसभेची मतमोजणी 13 मे रोजी होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagar Panchayat-Nagar Parishad elections जाहीर… परंतु इच्छुकांना इशारा! ‘हे’ केल्यास थेट जेलची वारी! काय म्हणतो कायदा?

Bishnoi Gang: धक्कादायक! हल्लेखोर आले अन् धाड... धाड... धाड... प्रसिद्ध कबड्डीपटूला बिश्नोई टोळीनं संपवलं, प्रकरण काय?

NZ vs WI : न्यूझीलंडच्या ३७ धावांत ६ विकेट्स; वेस्ट इंडिजने सॉलिड मॅच फिरवली, ७ धावांनी बाजी मारली

फॅमिली मॅन म्हणवणाऱ्या अभिनेत्याचे अनेक अभिनेत्रींशी शारीरिक संबंध; डिटेक्टीव्हची पोलखोल; पत्नीलाही सगळं माहितीये पण...

Latest Marathi News Live Update : कोल्हापूरात शिंदे सेनेच्या मेळाव्यापूर्वी कर्मचाऱ्याला विजेचा धक्का

SCROLL FOR NEXT