Voting Machine esakal
देश

Karnataka Election : गैरसमजुतीतून ग्रामस्थांनी केली मतदान यंत्रांची तोडफोड; अधिकाऱ्यांनाही धक्काबुक्की

मतदान प्रक्रिया अर्ध्यावरच संपवून यंत्रे परत नेत असल्याच्या गैरसमजुतीतून ग्रामस्थांनी मतदानयंत्रे फोडल्याची घटना घडली.

सकाळ डिजिटल टीम

मतदान प्रक्रियेसाठी नेमलेल्या अधिकाऱ्यांनाही धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडला.

बेळगाव : राज्याच्या अनेक भागात मतदानाला (Karnataka Assembly Election) कमी-अधिक प्रमाणात प्रतिसाद मिळाल्याचे वृत्त हाती आले असताना बसवाण बागेवाडी तालुक्यात (Basavan Bagewadi) मतदान प्रक्रियेला गालबोट लागल्याचा प्रकार घडला आहे.

मसबिनाळ येथे दाखल झालेली जादा मतदानयंत्रे (Voting) विजापूरकडे नेण्यात येत होती. या दरम्यान, मतदान प्रक्रिया अर्ध्यावरच संपवून यंत्रे परत नेत असल्याच्या गैरसमजुतीतून ग्रामस्थांनी मतदानयंत्रे फोडल्याची घटना घडली.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, मसबिनाळ (ता. बसवाण बागेवाडी, जि. विजापूर) येथे दाखल झालेली जादा मतदानयंत्रे मनबिसनाळ येथून विजापूरला नेण्यात येत होती; पण, मतदान प्रक्रिया अर्ध्यावर सोडून मतदानयंत्रे नेण्यात येत असल्याच्या गैरसमजुतीतून ग्रामस्थांनी गोंधळ माजविला. या गोंधळात मतदानयंत्रे फोडून अधिकाऱ्यांच्या वाहनाचेही नुकसान करण्यात आले.

तसेच, मतदान प्रक्रियेसाठी नेमलेल्या अधिकाऱ्यांनाही धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडला. मसबिनाळ येथे दाखल झालेली जादा मतदानयंत्रे विजापूरकडे नेत असताना ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांकडे चौकशी केली. पण अधिकाऱ्यांकडून समाधानकारक माहिती न मिळाल्याने संतापलेल्या ग्रामस्थांनी मतदानयंत्रे फोडून टाकल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission : कर्मचारी अन् पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी; आठव्या वेतन आयोगात नेमकं काय ठरणार?, चर्चा निर्णायक टप्प्यात

Nagpur Cyber Fraud: डिलिव्हरी बॉयच्या मुखवट्याआड उभारले ठकबाजांचे साम्राज्य; महिला अटकेत, तिघे फरार; ‘म्युल’ खात्यांच्या रॅकेटचा पर्दाफाश

Sangli Road Accident : ड्यूटी संपली, भूक लागल्याने नाश्ता शोधायला निघाले अन्...; सांगलीत उड्डाणपुलावर भीषण अपघात, कारच्या धडकेत 24 वर्षीय डॉक्टर तरुणीचा दुर्दैवी अंत

Koyna Dam: नवजाला ९१ मिमी पाऊस! कोयना धरणातील पाणीसाठा ९२.७० टीएमसीवर, महाबळेश्वरला उघडीप तर कोयनानगरला पाऊस सुरूच

Sadabhau Khot: 'देशात जगणं स्वस्त, मरणं महाग झालंय': सदाभाऊ खोत, फुकट धान्य आणि अनुदान थांबवा

SCROLL FOR NEXT