Karnataka Assembly Election esakal
देश

BJP Politics : 'जोपर्यंत मोदीजी आहेत, तोपर्यंत राहुल गांधी कधीच पंतप्रधान होणार नाहीत'; मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान

कर्नाटकात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षानं (BJP) जोरदार तयारी केली आहे.

सकाळ डिजिटल टीम

राहुल गांधी लंडनला गेल्यावर आपल्या संसदेला शिव्या घालतात.

Karnataka Assembly Election : कर्नाटकात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षानं (BJP) जोरदार तयारी केली आहे.

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा (Assam CM Himanta Biswa Sarma) यांनी कर्नाटकातील कनकगिरी आणि कोप्पळ या शहरांमध्ये विजय संकल्प यात्रेदरम्यान (Vijay Sankalp Yatra) काँग्रेसवर निशाणा साधला.

कनकगिरीमध्ये हिमंता सरमा म्हणाले, 'जोपर्यंत मोदीजी आहेत, तोपर्यंत राहुल गांधी कधीच पंतप्रधान होऊ शकणार नाहीत. आम्हाला इथं (कर्नाटक) भाजपला सत्तेत आणायचं आहे. आम्हाला आता बाबरी मस्जिद नकोय, रामजन्मभूमी हवी आहे.'

राहुल गांधींनी (Rahul Gandhi) लंडनमध्ये भारताची बदनामी करण्याचा प्रयत्न केला, पण मी त्यांना सांगू इच्छितो की, जोपर्यंत मोदीजी (Narendra Modi) आहेत तोपर्यंत तुम्ही पंतप्रधान होऊ शकणार नाही, असंही सरमा म्हणाले.

सरमा पुढं म्हणाले, 'आम्हाला कर्नाटकात भाजपचं सरकार आणायचं आहे. ही विधानसभा निवडणूक आमच्यासाठी सेमीफायनल आहे. अंतिम फेरीत लढून नरेंद्र मोदींची तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी निवड करणं हे आमचं मुख्य उद्दिष्ट आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भारत ‘अमृत काल’मध्ये विश्वगुरू बनेल.'

पीएम मोदी कर्नाटक आणि भारताच्या विकासावर काम करत आहेत. ते लंडन किंवा अमेरिकेला गेले की आपल्या देशाचं गुणगान करतात, पण राहुल गांधी लंडनला गेल्यावर आपल्या संसदेला शिव्या घालतात, अशी टीकाही त्यांनी राहुल गांधींवर केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT