Karnataka Assembly Election Result 2023 esakal
देश

Karnataka Election Result : कर्नाटकात भाजपचा सुपडासाफ; 'ही' आठवण काढत डीकेंना कोसळलं रडू

कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे कल हाती आले आहेत. या निवडणुकीत भाजपला काँग्रेसनं धोबीपछाड दिलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

2020 मध्ये मनी लाँड्रिंग प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयानं डीकेंना अटक केली होती.

Karnataka Assembly Election Result 2023 : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे कल हाती आले आहेत. या निवडणुकीत भाजपला काँग्रेसनं धोबीपछाड दिलं आहे. काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळालं आहे.

काँग्रेसनं 128 पेक्षा अधिक जागांवर आघाडी घेतली आहे. तर, भाजपला अवघ्या 67 जागांवर आघाडी मिळाली आहे. मात्र, असं असलं तरी भाजप कर्नाटकात सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं जात आहे.

कर्नाटकात ऑपरेशन लोटस होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. त्यामुळं काँग्रेसनं आपल्या आमदारांना रोखण्यासाठी खास प्लान तयार केला आहे. स्वत: काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आमदारांवर लक्ष ठेवून आहेत.

दरम्यान, डी.के. शिवकुमार यांनी कर्नाटकमधील विजयाचं श्रेय कार्यकर्त्यांना दिलं आहे. या यशाबद्दल काँग्रेस नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले. तर, पक्ष नेतृत्त्वाबद्दल बोलताना ते भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. सोनिया गांधी यांनी २०२० मध्ये तिहार जेलमध्ये माझी भेट घेतली, त्यावेळी, मनी लाँड्रिगप्रकरणी ईडीने मला अटक केली होती, असे सांगताना शिवकुमार यांना अश्रू अनावर झाले होते. दरम्यान, काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाने माझ्यावर विश्वास दाखवत मला कर्नाटक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली, असेही शिवकुमार यांनी म्हटले. तर, यावेळी राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेची आठवणही त्यांनी करुन दिली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT