Karnataka Election Result
Karnataka Election Result esakal
देश

Karnataka Result Video : मतमोजणी सुरु होण्यापूर्वीच केंद्रावर हाणामारी; पोलिस अन् तहसीलदारांमध्ये बाचाबाची

संतोष कानडे

Karnataka Assembly Election Results 2023 : कर्नाटक विधानसभेसाठी झालेल्या निवडणुकीनंतर आज मतमोजणी होत आहे. भाजप आणि काँग्रेस यांच्यात मुख्य लढत होत आहे. मतमोजणीला सुरुवात झालेली असून त्यापूर्वीच एक घटना घडली आहे.

सहायक निवडणूक अधिकारी यांना पोलिसांनी मतमोजणी केंद्रात जाण्यास अडवण्याने तणाव निर्माण झाला. त्यानंतर चामराजनगर मतमोजणी केंद्रावर हाणामारी झाल्याची माहिती आहे. या घटनेमुळे तहसीलदार आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. शेवटी जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेवरून अधिकारी स्ट्राँग रूममध्ये गेले. या घटनेने खळबळ उडाली आहे.

कर्नाटकात 36 केंद्रांवर सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. कर्नाटकातील 224 जागांसाठी 10 मे रोजी निवडणूक झाली. कर्नाटकातील निवडणुकीसाठी 72.67 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता.

विधानसभा निवडणुकीसाठी एकूण 2,615 उमेदवार उभे आहेत. त्यामध्ये 2,430 पुरुष तर 184 महिला उमेदवार आणि एक तृतीयपंथीय उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. कर्नाटकात 10 मे रोजी मतदान झालं होतं.

'आमच्या अटी मान्य करणाऱ्या कोणत्याही पक्षासोबत आम्ही युती करण्यास तयार आहोत', असे धजद नेते आणि माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी (H. D. Kumaraswamy) यांनी म्हटलं असून धजदला (JDS) ५० जागा मिळतील. धजद फार कमी जागांवर जिंकेल, असा अंदाज अनेक सर्वेक्षणांनी वर्तवला आहे; मात्र आमच्या पक्षाला ५० जागा मिळतीलच, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Molestation case : राजभवनातल्या तीन अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल; महिलेच्या आरोपानंतर पोलिसांची मोठी कारवाई

Fact Check: दागिने चोरल्यामुळे पंतप्रधान मोदींना घरातून हाकलण्यात आल्याचा दावा खोटा; वृत्तपत्राचे व्हायरल फोटो खोटे

Dindori Lok Sabha Constituency : गुरुजींसमोर ताईंना राजकीय खिचडी शिजवण्याचे आव्हान; दिंडोरी कांटे की टक्कर

Bibhav Kumar Detained: स्वाती मालीवाल यांच्यावर झालेल्या मारहाणीप्रकरणी केजरीवालांच्या पीएला पोलिसांनी घेतले ताब्यात

Share Market Closing: शेअर बाजार तेजीसह बंद; सेन्सेक्स 74,005 वर, कोणते शेअर्स वधारले?

SCROLL FOR NEXT