देश

शरद पवार बंगळुरुत; कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा आला फोन; म्हणाले...

विनायक होगाडे

बंगळुरु : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची आज बंगळुरू येथे भेट घेतली आहे. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी ही भेट झाली.

या भेटीबद्दल शरद पवार यांनी ट्विट करत म्हटलंय की, बंगळुरुमध्ये गेलो असता मला कर्नाटकचे मुख्यमंत्री श्री. बोम्मई यांचा फोन आला. त्यांनी माझ्याशी भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांचं पदाचा मान राखत मी त्यांना भेट घेण्यासाठी गेलो. त्यांच्या पाहुणचाराबद्दल मी त्यांचा मनपूर्वक आभारी आहे. इथून पुढे महाराष्ट्र आणि कर्नाटक ही दोन राज्ये येत्या काही वर्षांमध्ये सहकारी दृष्टीने एकत्र काम करत राहतील अशी आशा आहे, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

त्यांनी कर्नाटक आणि महाराष्ट्र यांच्यातील पाणीवाटपाबद्दल तसेच कर्नाटक आणि महाराष्ट्रातील पुराच्या प्रकरणांमध्ये परस्पर सहकार्याबद्दल बोलले. त्यांनी दोन्ही राज्यांमध्ये (कर्नाटक आणि महाराष्ट्र) आंतरराज्यीय पाणी समस्या आणि नदीच्या पाणीवाटपावर सविस्तर चर्चा करण्यासाठी लवकरच बैठक घेण्याचे ठरवले. त्यांनी दिल्लीत या विषयावर चर्चा करण्याचे ठरवले.

याबाबत कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी म्हटलंय की, मी आज शरद पवार आणि जयंत पाटील यांची भेट घेतली. आम्ही पाणीवाटपावर चर्चा केली. तसेच आम्ही अप्पर कृष्णा प्रोजेक्टवर देखील चर्चा केली. आमची दिल्लीमध्ये आणखी एक भेट आहे. आम्ही दुधगंगा प्रोजेक्ट आणि पूरपरिस्थितीबाबतही चर्चा केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Local: लोकलसंदर्भात मोठी अपडेट! पुणे स्टेशनवरुन लोकल ट्रेन सुटणार नाहीत

MS Dhoni: यंदा न खेळताच धोनीची ‘आयपीएल’मधून निवृत्ती? अखेरच्या मोसमाची शक्यता

Bidkin Crime DMIC: बिडकीन DMIC परिसरात दोन तरुणांचे मृतदेह; विषारी औषधाची बाटली आढळल्याने संशय, तपास सुरू..

Latest Marathi News Live Update : नाशिकच्या मेडिकल कॉलेजमध्ये लिफ्ट कोसळून महिलेचा मृत्यू

IPL 2026, Purple Cap: भुवनेश्वर कुमारने बुमराहच्या पंक्तीत स्थानही मिळवलं अन् पर्पल कॅपही डोक्यावर चढवली; शर्यतीत टॉप-५ कोण?

SCROLL FOR NEXT