देश

कर्नाटकात सोमवारपासून कडक लॉकडाउन; काय सुरु, काय बंद?

सकाळ वृत्तसेवा

बंगळूर : राज्यात सध्या जारी असलेला जनता कर्फ्यू (curfew) कोरोनावर नियंत्रण (covid-19 control) आणण्यात अपयशी ठरल्याने मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा (CM karnataka) यांनी सोमवार (१०) पासून राज्यात संपूर्ण लॉकडाउनची (lcokdown) घोषणा शुक्रवारी (७) केली. सोमवारी सकाळी ६ वाजल्यापासून २४ मे रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत लॉकडाउन जारी राहील.

या काळात ऑटो, कॅब आणि बस वाहतूक पूर्णपणे बंद (bus trasport close) राहणार आहे. केवळ दूध, भाजी, किराणा साहित्य आणि वैद्यकीय दुकान यासारख्या जीवनावश्यक वस्तूंना परवानगी आहे. बाकी सर्व काही संपूर्ण बंद असेल. रस्ते आणि इमारतींची कामे प्रतिबंधित नाहीत. सरकारी कार्यालये (government office) अंशतः कार्यरत राहतील. मार्गसूचित यावर सविस्तरपणे स्पष्ट केले जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

लॉकडाउन दरम्यान दुकाने, हॉटेल आणि औद्योगिक व्यवहार प्रतिबंधित आहेत. सकाळी ६ ते सकाळी १० या वेळेत आहार, दूध, फळे आणि मांस विक्रीला संधी देण्यात आली आहे. मद्याचे पार्सल नेण्यास केवळ सकाळी ६ ते सकाळी १० दरम्यान परवानगी आहे. भाज्यांची वाहनांतून फिरती विक्री करण्याची संधी आहे. सरकारी कार्यालये काही प्रमाणात काम करणार आहेत.

सिनेमा हॉल, शॉपिंग मॉल्स, व्यायाम शाळा, स्पोर्टस कॉम्प्लेक्स, स्टेडियम, जलतरण तलाव, उद्याने, करमणूक पार्क, क्लब, थिएटर, बार आणि प्रेक्षागृह आणि समुदाय इमारत आदी ठिकाणे बंद असतील. १० मे नंतर विवाह सोहळ्यासह कोणत्याही समारंभाचे आयोजन करण्यास बंदी राहणार आहे. आधीच ठरलेल्या लग्नांसाठी केवळ ५० लोकांना परवानगी असेल. राज्याच्या सीमा पूर्णपणे बंद राहतील. आंतरराज्य आणि आंतर जिल्हा वाहतूक बंद राहणार आहे.

काय बंद राहणार?

  • शाळा, महाविद्यालये बंद.(ऑनलाइन शिक्षण सुरू)

  • हॉटेल, रेस्टॉरंट, अतिथीगृह बंद. पार्सल सेवा सुरू.

  • सिनेमा, जिम, मॉल, योग सेंटर, क्लब, बार बंद.

  • सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक कार्यक्रम बंद

  • सर्व धार्मिक क्षेत्रे बंद राहतील. केवळ पुजाऱ्यांकडून पूजा करणे.

  • कोणत्याही खासगी, सरकारी बस किंवा वाहनांची वाहतूक बंद

  • विमानतळावर बस आणि टॅक्सी असेल. प्रवासासाठी रेकॉर्ड अनिवार्य

काय सुरू राहणार?

  • रेशन दुकाने, किराणा, भाज्या, दूध व बेकरी, मांस दुकाने

  • प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमे

  • नियोजित विमाने आणि रेल्वे गाड्या

  • टॅक्सी फक्त आणीबाणीप्रसंगी

  • उद्योगांतर्गत काम करण्यास परवानगी

  • दारूची दुकाने सकाळी ६ ते रात्री १०

  • बँक, विमा कंपनी आणि एटीएम खुले

  • पेट्रोल, डिझेल, एलपीजी, पोस्ट ऑफिस खुले

  • सर्व शेती व त्यासंबंधित कामांना परवानगी आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024 LSG vs KKR Live Score: रमनदीपने अर्शिन कुलकर्णीचा घेतला अफलातून कॅच! स्टार्कला मिळाली पहिली विकेट

Sharad Pawar : आपण सर्वजण एक आहोत तोपर्यंत कोणी धक्का लावू शकत नाही : शरद पवार

Prakash Ambedkar : पवार व ठाकरे यांची मागच्या दरवाजातून भाजपशी चर्चा; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा दावा

SCROLL FOR NEXT