Karnataka CM Siddaramaiah esakal
देश

CM Siddaramaiah : मोदी सरकारकडून कर्नाटकाला सापत्नभावाची वागणूक; मुख्यमंत्री सिद्धरामय्यांचा आरोप

आत्तापर्यंत दुष्काळ निवारणाच्या कामासाठी केंद्राने एक पैसाही दिलेला नाही.

सकाळ डिजिटल टीम

राज्यातील एकूण २३६ तालुक्यांपैकी २१६ तालुक्यांमध्ये दुष्काळाचे सावट असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

बंगळूर : भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने (Central Government) दुष्काळ निवारण कार्यासाठी निधी न देऊन कर्नाटकला सापत्नभावाची वागणूक देत असल्याचा आरोप मुख्यमंत्री सिद्धरामय्या (Siddaramaiah) यांनी शनिवारी केला.

उडुपी येथील जागतिक बंट परिषदेला उपस्थित राहण्यासाठी निघालेल्या सिद्धरामय्या यांनी मंगळूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर (एमआयए) प्रसारमाध्यमांसमोर ही टीका केली. त्यांनी निदर्शनास आणून दिले की, केंद्रीय पथकानेही त्यांच्या राज्याच्या दौऱ्यात संपूर्ण कर्नाटकातील दुष्काळी परिस्थितीची कबुली दिली. राज्यातील एकूण २३६ तालुक्यांपैकी २१६ तालुक्यांमध्ये दुष्काळाचे सावट असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

ते म्हणाले, ‘‘कर्नाटकात दुष्काळामुळे एकूण ३३ हजार ७७० कोटींचे नुकसान झाले असूनही आम्ही केंद्र सरकारला दुष्काळावर मात करण्यासाठी १७ हजार ९०१ कोटी देण्याचे आवाहन केले आहे. दुर्दैवाने कर्नाटकच्या शिष्टमंडळाला संबंधित मंत्र्यांना भेटण्याची संधी नाकारण्यात आली. आत्तापर्यंत दुष्काळ निवारणाच्या कामासाठी केंद्राने एक पैसाही दिलेला नाही.’’

महामंडळ नियुक्ती

सिद्धरामय्या म्हणाले, ‘‘पहिल्या टप्प्यात निगम आणि महामंडळांवर आमदारांची नियुक्ती केली जाईल. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात उर्वरित निगम आणि महामंडळांवर माजी आमदार आणि कार्यकर्त्यांची नियुक्ती केली जाईल. या नियुक्त्या लवकरच केल्या जातील.

बेळतंगडी पोलिसांनी नोंदवलेल्या गुन्ह्याला उत्तर देताना त्यांनी बेळतंगडीचे भाजप आमदार हरीश पुंजा यांचे वर्णन ‘शहाळे’ असे केले. पुंजा यांनी सोशल मीडियावर मुख्यमंत्र्यांना ‘कर्नाटकचे कलेक्शन मास्टर (सीएम)’ असे लेबल करून पोस्ट केलेल्या छायाचित्रांनंतर सिद्धरामय्या यांनी प्रतिक्रिया दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नगराध्यक्षांची निवड जनतेतूनच! दिवाळीतच वाजणार निवडणुकांचा बिगुल; पहिल्या टप्प्यात नगरपालिका किंवा झेडपी, पंचायत समित्यांची निवडणूक

Morning Breakfast Recipe: सकाळी नाश्त्यात बनवा हेल्दी एग रोल, पाहा रेसिपीचा Video

आजचे राशिभविष्य - 03 ऑक्टोबर 2025

अग्रलेख : अस्वस्थ स्वातंत्र्ययोद्धा

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 03 ऑक्टोबर 2025

SCROLL FOR NEXT