Karnataka CM Siddaramaiah esakal
देश

VIDEO : अंधश्रद्धेमुळं अनेक वर्षे बंद होता CM कार्यालयाचा दरवाजा, मुख्यमंत्र्यांनी 'ती' शंका दूर केली अन्..

मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाचा दक्षिणाभिमुख दरवाजा या आधीच्या मुख्यमंत्र्यांनी कधीच वापरला नव्हता.

सकाळ डिजिटल टीम

पाच वर्षांपूर्वी मुख्यमंत्री असताना सिद्धरामय्या यांनी हा दक्षिणाभिमुख दरवाजा उघड होता.

बंगळूर : वास्तूदोषाच्या कारणावरून बंद केलेल्या त्यांच्या कार्यालयाचा दरवाजा मुख्यमंत्री सिद्धरामय्या (CM Siddaramaiah) यांनी स्वतः उघडला. मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाचा दक्षिणाभिमुख दरवाजा या आधीच्या मुख्यमंत्र्यांनी कधीच वापरला नव्हता.

अन्नभाग्य योजनेसंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेण्यासाठी विधानसौध इथं दाखल झालेले मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना त्यांच्या कार्यालयाचे दक्षिणेकडील दार बंद असल्याचे निदर्शनास आले.

वास्तूदोषामुळे ते बंद असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. पश्चिम दरवाजातून कर्मचारी आत आले आणि दक्षिण दरवाजा उघडल्यानंतर त्याच दारामधून सिद्धरामय्या यांनी त्यांच्या कार्यालयात प्रवेश केला.

निरोगी मन, स्वच्छ हृदय, लोकांची काळजी, चांगली हवा आणि प्रकाश असेल तर ती वास्तू चांगली असते, असे सिद्धरामय्या यांनी घटनास्थळी अधिकाऱ्यांना सांगून अंधश्रध्दा दूर करण्याचा प्रयत्न केला. पाच वर्षांपूर्वी मुख्यमंत्री असताना सिद्धरामय्या यांनी हा दक्षिणाभिमुख दरवाजा उघड होता. त्यांनी सहा जून २०१३ रोजा दक्षिण दरवाजा उघडला. आता पुन्हा पाच वर्षांनी दरवाजा उघडण्याचा योग त्यांना आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu Temple Entry Law : जन्माने हिंदू नसाल तर मंदिरात प्रवेश मिळणार नाही? हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

Solapur News: सोलापूरकरांना महागाईचा आणखी एक झटका! १ जुलैपासून कटिंग १३०, दाढी ७० रुपये; नाभिक संघटनेची १०% दरवाढ

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Paud Agriculture Day: पौड येथे कृषी दिन उत्साहात साजरा; वसंतराव नाईक जयंतीनिमित्त शेतकरी सन्मान व योजनांवर मार्गदर्शन

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

SCROLL FOR NEXT