Congress
Congress 
देश

असंतुष्ट आमदारांना काँग्रेसची शेवटची संधी 

वृत्तसंस्था

बंगळूर : असंतुष्ट आमदारांना परत पक्षात येण्याची कॉंग्रेस पक्षश्रेष्ठींनी शेवटची संधी दिली आहे. अधिवेशन संपण्यापूर्वी विधानसभेच्या कामकाजात सहभागी होण्याचे आवाहन त्यांना केले आहे. असंतुष्ट आमदारांनी चर्चेची तयारी दाखविल्याचे समजते. 

असंतुष्ट आमदार रमेश जारकीहोळी, महेश कुमठळ्ळी, डॉ. उमेश जाधव व बी. नागेंद्र हे महिन्यापासून मुंबईत ठाण मांडून आहेत. कॉंग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला किंवा विधिमंडळाच्या कामकाजातही त्यांनी भाग घेतलेला नाही. एआयसीसीचे मुख्य सचिव व राज्य कॉंग्रेसचे प्रभारी वेणुगोपाल यांनी असंतुष्ट आमदारांशी दूरध्वनीवर संपर्क साधून त्यांच्याशी चर्चा केली. पक्षात परत येण्यासाठी देण्यात आलेल्या संधीचा फायदा घेण्याचे आवाहन त्यांना केले. कारवाईची तक्रार दाखल केल्यानंतर ते आता चर्चेला तयार झाले आहेत. 

उमेश जाधव यांचा राजीनामा? 
"ऑपरेशन कमळ' यशस्वी झाले न झाले तरी चिंचोळीचे आमदार उमेश जाधव यांचा आमदारपदाचा राजीनामा निश्‍चित आहे. त्यांनी कॉंग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. कॉंग्रेस सोडल्यानंतर ते भाजपमध्ये प्रवेश करणार असून, येत्या लोकसभा निवडणुकीत गुलबर्गा मतदारसंघातून निवडणूक लढविणार असल्याचे समजते. 

न्यायालयीन चौकशी फेटाळली 
ध्वनिफीत प्रकरणाची विशेष तपास पथकामार्फतच (एसआयटी) चौकशी योग्य असल्याचे सांगून विधानसभेचे अध्यक्ष रमेशकुमार यांनी न्यायालयीन चौकशीची शक्‍यता फेटाळून लावली. न्यायालयीन चौकशीला विलंब लागतो. येथे करण्यात आलेले आरोप गुन्हेगारी स्वरूपाचे आहेत. सरकार अस्थिर करण्यासाठी पैसे देण्याचे आमिष दाखविणे हा गुन्हा आहे. अशा गुन्ह्यात शिक्षा देण्याचा न्यायालयीन चौकशीच्या अधिकाऱ्यांना अधिकार नसतो. एसआयटीमार्फत चौकशीत गुन्हा निश्‍चित झाल्यास कारवाई करणे शक्‍य होते, असे ते म्हणाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT