Karnataka Assembly Election 2023
Karnataka Assembly Election 2023 esakal
देश

Karnataka Election : 'या' मतदारसंघातील 35 पैकी 14 उमेदवार दहावी पास, तर चौथी शिक्षण झालेलाही उमेदवार रिंगणात

सकाळ डिजिटल टीम

यापैकी सर्वाधिक शिक्षण डॉ. रवी पाटील यांनी घेतले आहे. बेळगाव उत्तरमधील भाजपचे उमेदवार असून, पहिल्यांदा ते विधानसभेची निवडणूक लढवीत आहेत.

Karnataka Assembly Election 2023 : बेळगाव तालुक्यातील तीन विधानसभा मतदारसंघातील (Belgaum Assembly Constituency) 35 पैकी 14 उमेदवार दहावी पास आहेत. बेळगाव उत्तरला सर्वात कमी चौथी, सर्वाधिक शिक्षण एमएस (ऑर्थो) वैद्यकीय शिक्षण घेतलेला उमेदवार (Educated Candidate) निवडणूक आखाड्यात आहे.

बेळगाव तालुक्यात ३ विधानसभा मतदारसंघ आहेत. यात बेळगाव उत्तर, बेळगाव दक्षिण आणि बेळगाव ग्रामीण मतदारसंघांचा समावेश आहे. बेळगाव उत्तरला 15 उमेदवार असून, बेळगाव दक्षिणला 8 व बेळगाव ग्रामीणला 12 उमेदवार निवडणूक लढवीत आहेत. तिन्ही विधानसभा मतदारसंघातून 35 उमेदवार आखाड्यात आहेत.

यापैकी सर्वाधिक शिक्षण डॉ. रवी पाटील यांनी घेतले आहे. बेळगाव उत्तरमधील भाजपचे उमेदवार असून, पहिल्यांदा ते विधानसभेची निवडणूक लढवीत आहेत. एमएस (ऑर्थो) शिक्षण घेतले आहे. या संघातून सर्वात कमी चौथी शिक्षण असलेला उमेदवार निवडणूक लढवीत आहे. दिलशाद ताशिलदार असे त्यांचे नाव असून, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या उमेदवारीवर निवडणूक लढवीत आहेत.

बेळगाव उत्तर

उमेदवार : शिक्षण, आसिफ सेठ (कॉंग्रेस)-बारावी, डॉ. रवी पाटील (भाजप)-एमएस (ऑर्थो), राजकुमार टोप्पण्णावर (आप)-बीबीए, शिवानंद मुगळीहाळ (धजद)-दहावी, दिलशाद ताशीलदार (रिपब्लिकन पार्टी इंडिया)-चौथी, प्रवीण हिरेमठ (कल्याण राज्य प्रगती पक्ष)-दहावी, बसवराज जरली (कर्नाटक राष्‍ट्र समिती)-एलएलबी, मल्लाप्पा चौगुले (उत्तम प्रजाकीय पक्ष)-एमबीए, अमर येळ्ळूकर (म. ए. समिती)-एलएलबी, अशोक गोवेकर (अपक्ष)-पाचवी, काशीराम चव्हाण (अपक्ष)-आयटीआय, नागेश विवटे (अपक्ष)-दहावी, इस्माईल मगदूम (अपक्ष)-दहावी, विशाल गायकवाड (अपक्ष)-बीई, श्रीनिवास तळवार (अपक्ष) -दहावी.

बेळगाव दक्षिण

उमेदवार-शिक्षण, अभय पाटील (भाजप)-आयटीआय, नूरअहमद मुल्ला (आप)-दहावी, प्रभावती मास्‍तमर्डी (कॉंग्रेस)-डी. फार्मा, श्रीनिवास ताळूकर (धजद)-बारावी, हणमंत मडीवलर (कर्नाटक राष्ट्र समिती)-दहावी, भारत गती (अपक्ष)-दहावी, रमाकांत कोंडुसकर (म. ए. समिती-बारावी, केंप संतोष (अपक्ष)-दहावी.

बेळगाव ग्रामीण

उमेदवार-शिक्षण, नागेश मनोळकर (भाजप)-बारावी, टी. मालती (आप)-बीई, यमनाप्पा तळवार (बसप)-दहावी, लक्ष्मी हेब्बाळकर (कॉंग्रेस)-एमए, शंकरगौडा पाटील (धजद)-बारावी, गणेश सिंगण्णावर (आरपीआय)-एमबीए, शकुंतला इलिगार (कर्नाटक राष्ट्र समिती)-डी. एड, बसवराज कुड्डेमी (अपक्ष)-दहावी, रवीकुमार(अपक्ष)-दहावी, राजू चौगुले (म. ए. समिती-बी. ई., रुपेश कडू (अपक्ष)-दहावी, संजीव गणाचीरी (अपक्ष)-दहावी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : काश्मीरमधील 4 दहशतवादाशी संबंधित मालमत्ता जप्त

Virat Kohli PBKS vs RCB : पंजाब विराटवर फारच मेहरबान! पाच षटकात सोडले तीन कॅच; पाहा Video

Pune Fraud News : आयटी अभियंता तरुणीच्या नावावर परस्पर उचलले ४५ लाखांचे कर्ज; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Mumbai News : मानखुर्द येथील विषबाधा प्रकणी अधिकाऱ्यांविरुद्ध मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; गर्जना संघटनेची मागणी

Prajakta Mali : अखेर सही झाली! प्राजक्ता माळीच्या आयुष्यात घडतंय काय? म्हणते "आयुष्यातील सर्वात..."

SCROLL FOR NEXT