Karnataka Election 2023 BJP candidate for Dr Kranti Kiran
Karnataka Election 2023 BJP candidate for Dr Kranti Kiran esakal
देश

Karnataka Election : ऑपरेशन थिएटरमधून थेट निवडणूक आखाड्यात; राजकारणाची 'सर्जरी' करण्याचा डॉक्टरांचा मानस

विनायक जाधव

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याचा प्रभाव त्यांच्यावर पडला. भारतीय जनता पक्षाकडून आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून ते भाजपच्या संपर्कात आले.

Karnataka Assembly Election 2023 : गरिबांचे वैद्य, ज्येष्ठ न्यूरोसर्जन आणि हुबळीतील ऑपरेशन किंग म्हणून ओळख असलेले डॉ. क्रांतीकिरण भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. ऑपरेशन थिएटरमधून थेट निवडणुकीच्या आखाड्यात उतरत राजकारणाची सर्जरी करण्याचा त्यांचा मानस आहे.

एमबीबीएस, एमएस शिक्षण झाल्यानंतर न्यूरो सर्जन म्हणून डॉ. क्रांतीकिरण (Dr. Kranthi Kiran) यांनी आपल्या सेवेला सुरुवात केली. हुबळीतील किम्स रुग्णालयात न्यूरो सर्जन विभागप्रमुख म्हणून त्यांनी काम केले आहे. काही वर्षांपूर्वी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर क्रांतीकिरण यांनी स्वतःचे ‘बालाजी न्यूरो सायन्स अँड ट्रामा सेंटर’ सुरू केले.

गरिबांवर उपचार करत त्यांनी गरिबांचे बंधू असेच नाव कमाविले आहे. कोरोनाच्या काळात त्यांनी रात्रंदिवस गरिबांची सेवा केली. वैद्यकीय सेवेचा व्यावसायिक पेशा असला तरी त्यांनी कोरोनाच्या काळात गरिबांना उत्तमोत्तम सेवा उपलब्ध करून दिली. त्यांनी आपल्या रुग्णालयाच्या माध्यमातून गरीबांना मोफत उपचार उपलब्ध व्हावेत, या उद्देशाने झोपडपट्टी परिसरात मोफत आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन केले.

गरीब आणि गरजू लोकांना मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी त्यांनी आजवर शेकडो आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन केले आहे. ज्यात झोपडपट्टी परिसरात राहणारे लोक, हमाल अशा समुदायांचा समावेश आहे. अशी आरोग्य शिबिरे भरविताना त्या परिसरात असलेल्या मूलभूत सुविधांवरही त्यांनी भर दिला असून त्या ठिकाणी आवश्यक त्या सुविधा उपलब्धही करून दिल्या आहेत.

मागील दहा वर्षांपासून ही त्यांची सेवा सुरूच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याचा प्रभाव त्यांच्यावर पडला. भारतीय जनता पक्षाकडून आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून ते भाजपच्या संपर्कात आले. भाजपने त्यांच्या कार्याची दखल घेत हुबळी-धारवाड पूर्व राखीव मतदारसंघातून त्यांना पक्षाची उमेदवारी दिली आहे.

प्रचार काळातही उपचार करण्यावर डॉ. क्रांतीकिरण यांनी भर दिला आहे. प्रचारासाठी असलेल्या वाहनातही त्यांनी आपले वैद्यकीय उपचार किट ठेवले असून ज्या ठिकाणी प्रचारास जातील तेथे रुग्ण आढळल्यास त्यांच्यावर उपचार करत आहेत. यासह वैद्यकीय सल्लाही देत आहेत. उष्मा वाढला असून प्रचारासाठी कार्यकर्ते आणि लोक बाहेर पडताना पाहून उष्माघातापासून कसा बचाव करावा? याच्यादेखील टिप्स ते सर्वांना देत आहेत. ‘‘आपण प्रथम डॉक्टर असून नंतर राजकारणी आहोत. प्रचाराच्या वेळेस कोणी आजारी दिसून आल्यास आपण प्रथम त्यांच्या उपचारावर भर देतो. हाच माझा धर्म आहे. त्या पलीकडे जाऊन समाजसेवेचा वसा जपण्यासाठी मी राजकारणात उतरत आहे’’, असे डॉ. क्रांतिकिरण सांगतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress: या मतदारसंघात काँग्रेस करतंय चक्क 'नोटा'चा प्रचार, काय आहे कारण?

Look Younger: मेकअप आणि सर्जरी न करता त्वचेला तरुण ठेवण्यासाठीचे ५ सोपे मार्ग

Devendra Fadnavis: ...त्यामुळं मोदींनी पवार-ठाकरेंना कुठलीही ऑफर दिलेली नाही; फडणवीसांचं स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update: केजरीवालांनंतर सोरेन यांना दिलासा मिळणार का? १३ मे रोजी सुप्रीम कोर्टात सुनावणी

Mahavitaran : महावितरणकडे आता चॅट बॉटद्वारे तक्रार नोंदवता येणार

SCROLL FOR NEXT