BS Yediyurappa esakal
देश

Politics : येडियुरप्पांनी काँग्रेसची धाकधूक वाढवली; सिद्धरामय्यांविरुध्द देणार 'हा' तगडा उमेदवार?

कर्नाटकातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी (Karnataka Assembly Election 2023) राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे.

सकाळ डिजिटल टीम

म्हैसूर जिल्ह्यातील वरुणा ही महत्त्वाची जागा आहे. इथून काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते सिद्धरामय्या निवडणूक लढवत आहेत.

बेंगळुरू : कर्नाटकातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी (Karnataka Assembly Election 2023) राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे.

दरम्यान, काँग्रेसचे दिग्गज नेते सिद्धरामय्या यांच्या विरोधात भारतीय जनता पक्ष (BJP) कोणाला उमेदवारी देणार आहे, याबाबत उत्सुकता आहे. मात्र, असं असतानाच माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी वरुणा जागेबाबत महत्वाचं विधान केलंय.

भाजपचे दिग्गज नेते बीएस येडियुरप्पा (BS Yediyurappa) यांनी त्यांचा मुलगा बीवाय विजयेंद्र (BY Vijayendra) वरुणामधून निवडणूक (Varuna Assembly Election) लढवण्याची शक्यता नाकारली नाहीये.

पत्रकारांनी येडियुरप्पांना विचारलं की, विजयेंद्र वरुणामधून रिंगणात उतरणार का? यावर त्यांनी चर्चा सुरू असल्याचं सांगितलं. सिद्धरामय्या यांना चांगलंच ठाऊक आहे की, ही निवडणूक त्यांच्यासाठी सोपी नाही. त्यांच्याविरोधात आम्ही चांगला उमेदवार उभा करू. आम्ही कडवी लढत देऊ. बघूया काय होतं ते, असं येडियुरप्पांनी स्पष्ट केलं.

वरुणामधून विजयेंद्र यांना तिकीट देण्याचा निर्णय पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वावर सोडला जाईल, असंही ते म्हणाले. पक्ष कार्यालयात झालेल्या संवादादरम्यान सिद्धरामय्या म्हणाले, 'माझ्या विरोधात कोण निवडणूक लढवणार आहे, याची मला पर्वा नाहीये. मी सक्षम आहे.' काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार यांनी येडियुरप्पांनी आव्हान करत त्यांनी स्वत: वरुणामधून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यास आम्ही त्यांचं स्वागत करु, अशी खिल्ली उडवली.

म्हैसूर जिल्ह्यातील वरुणा ही महत्त्वाची जागा आहे. इथून काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते सिद्धरामय्या निवडणूक लढवत आहेत. सध्या त्यांचा मुलगा यतिंद्र हे या जागेचं प्रतिनिधीत्व करत आहेत. मात्र, सिद्धरामय्या यांनी वरुणासोबत कोलारमधून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केलीये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News : अकोल्यात रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांचा संताप; यज्ञा हॉस्पिटलची तोडफोड; डॉक्टरांनी आरोप फेटाळले

Dhananjay Mahadik : दीपावलीसाठी 'भीमा' देणार सभासदांना प्रति टन दोनशे रुपये, तर सतत तीन वर्षे ऊस आलेल्या सभासदांना 25 किलो साखर मोफत

Pune Ganpati Visarjan : विसर्जन मिरवणुकीत आवाजाचा दणदणाट! लक्ष्मी रस्त्यावर ११५ डेसिबलची नोंद; ‘जेट विमाना’एवढा कानठळ्या बसवणारा दणदणाट

Kothrud News : कोथरूडमध्ये रस्त्यासाठी ४८० झाडांवर कुऱ्हाड; न्यायालयात जाण्याचा इशारा

एक्सप्रेस वेवर पावसात साचलेल्या पाण्यामुळे फॉर्च्युनरचा अपघात, भाजप आमदार गंभीर जखमी; तर दोघांना किरकोळ दुखापत

SCROLL FOR NEXT