Karnataka Election 2023 esakal
देश

Karnataka Election : चित्रा वाघांसमोरच रडले खासदार अन्‌ उमेदवार; भाजप कार्यकर्त्यांचा हायव्होल्टेज ड्रामा

कर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय वातावरण चांगलंच तापलंय.

सकाळ डिजिटल टीम

बेळगावात उमेदवारी नाकारल्यामुळं कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं.

Karnataka Election 2023 : कर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. भाजप-काँग्रेससह जेडीएस आमने-सामने आहेत, त्यामुळं रंगत आणखी वाढली आहे.

मात्र, असं असतानाच बेळगावात उमेदवारी नाकारल्यामुळं कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं. बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील भाजपचे उमेदवार नागेश मन्नोळकर यांच्या निवडणूक प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत महाराष्ट्र भाजपच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांच्यासमोर भाजप कार्यकर्त्यांचा हायव्होल्टेज ड्रामा पहायला मिळाला.

ग्रामीण मंडळाचे अध्यक्ष धनंजय जाधव यांना उमेदवारी नाकारल्यामुळं कार्यकर्त्यांनी बैठकीत तीव्र शब्दांत रोष व्यक्त केला. या वेळी खासदार इराण्णा कडाडी आणि जाधव यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. बेळगावमधील धर्मनाथ भवन इथं भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक झाली.

बेळगाव ग्रामीण मतदारसंघासाठी माजी आमदार संजय पाटील यांच्यासह ग्रामीण मंडळाचे अध्यक्ष धनंजय जाधव इच्छुक होते. मात्र, माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांनी बेळगाव ग्रामीण मतदारसंघातून मन्नोळकर यांना भाजपची उमेदवारी मिळवून दिली. त्याचे पडसाद चित्रा वाघ यांच्या बैठकीत पहावयास मिळाले. या गोंधळावेळी खासदार कडाडी आणि जाधव यांना अश्रू अनावर झाले. बैठकीत दोघंही डोळे पुसत बसले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs RR Live: इशान किशन बरसला, हेनरिच क्लासनही जबरदस्त खेळला; पण, राजस्थानच्या गोलंदाजांचे पुनरागमन, नितीश रेड्डी भिडला

MPSC पदसंख्या वाढ, मेडिकल कौन्सिल नियमांमध्ये बदल अन्...; मंत्रिमंडळ बैठकीत महायुती सरकारचे ८ महत्त्वाचे निर्णय

MPSC Success Story: पहुरजिऱ्याचा अजय दिघडेचा पराक्रम; MPSC उत्तीर्ण होऊन असिस्टंट कमिशनर पदावर झेप, आई-वडिलांच्या कष्टांना यशाची किनार..

SRH vs RR Live: इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले! पण, जिंकली Orange Cap; झेल घेताना दोन खेळाडू एकमेकांना आपटले

Gadchiroli Health: कोरची तालुक्यात गरोदर मातेसह बाळाचा मृत्यू; आशा वर्करची टाळाटाळी, रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता अन्..

SCROLL FOR NEXT