Karnataka Election Jagdish Shettar esakal
देश

Politics : 'भाजपनं आज तिसरी यादी जाहीर केली नाही तर मी..'; माजी मुख्यमंत्र्यांचा थेट पक्षाला अल्टिमेटम

भाजपनं आतापर्यंत उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. पक्षानं 224 पैकी 213 नावं जाहीर केली असून 11 नावांची घोषणा होणं बाकी आहे.

Balkrishna Madhale

जगदीश शेट्टर यांना निवडणूक लढविण्याबाबत विचारलं असता, त्यांनी समर्थकांशी बोलून निर्णय घेणार असल्याचं सांगितलं.

Karnataka Election 2023 : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि नाराज भाजप नेते जगदीश शेट्टर (Jagdish Shettar) यांनी 10 मे रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची तिसरी यादी जाहीर करण्यासाठी शनिवार (15 एप्रिल) पर्यंत भाजपला 'अल्टिमेटम' दिलाय.

भाजपनं आतापर्यंत उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. पक्षानं 224 पैकी 213 नावं जाहीर केली असून 11 नावांची घोषणा होणं बाकी आहे.

त्याचवेळी जगदीश शेट्टर यांना निवडणूक लढविण्याबाबत विचारलं असता, त्यांनी समर्थकांशी बोलून निर्णय घेणार असल्याचं सांगितलं. भाजप नेत्यांची भेट घेतली असता त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचंही बोललं जात आहे. निर्णयासाठी वरिष्ठांशी चर्चा करावी लागेल, असंही त्यांनी सांगितलंय.

पक्षानं माझा अपमान केला आहे. भाजपनं (BJP) यादी जाहीर न केल्यास पुढचं पाऊल उचलू, असंही त्यांनी स्पष्ट केलंय. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda) यांच्या भेटीतही त्यांनी असंच म्हटलं होतं की, ते आणखी दोन दिवस वाट पाहतील.

दुसरीकडं, हुबळी-धारवाड महानगरपालिकेच्या 16 भाजप सदस्यांनी शेट्टर यांना तिकीट जाहीर करण्यास विलंब केल्याच्या निषेधार्थ पक्षाचे प्रदेश प्रमुख नलिनकुमार कटील यांच्याकडं सामूहिक राजीनामे सुपूर्द केले आहेत. भाजपनं 189 उमेदवारांची पहिली आणि 23 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केल्यामुळं अनेक नेते नाराज आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT