Karnataka Assembly Election 2023  esakal
देश

VIDEO : तिकीट न मिळाल्यानं नाराज झालेल्या 'या' बड्या मंत्र्याला थेट मोदींचा फोन; नाराजी झाली दूर?

कर्नाटक विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. कर्नाटकात एकाच टप्प्यात निवडणूक होणार आहे.

Balkrishna Madhale

कर्नाटकात 10 मे रोजी मतदान होणार आहे. तर, 13 मे रोजी निवडणुकीचा निकाल लागणार आहे.

Karnataka Assembly Election 2023 : कर्नाटक विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. कर्नाटकात एकाच टप्प्यात निवडणूक होणार आहे. कर्नाटकात 10 मे रोजी मतदान होणार आहे. तर, 13 मे रोजी निवडणुकीचा निकाल लागणार आहे.

कर्नाटक विधानसभेच्या 224 जागांसाठी निवडणुका होणार आहेत. कर्नाटकात सध्या भाजपकडं 117, काँग्रेसकडं 69, जेडीएसकडं 32 आणि इतरांकडं सहा जागा आहेत. आता पुन्हा भाजप सत्तेवर येणार का? या प्रश्नाचं उत्तर 13 मे रोजी मिळणार आहे.

याचदरम्यान, आता एक महत्वाची बातमी समोर येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी कर्नाटकचे माजी मंत्री आणि भाजप नेते ईश्वरप्पा (Eshwarappa) यांच्याशी फोनवरून चर्चा केली आहे. याचा एक व्हिडिओ भाजप नेत्यानं शेअर केलाय.

भाजप नेत्यानं यावेळी निवडणूक न लढवण्याची घोषणा केली आहे. रिपोर्ट्सनुसार, आपल्या मुलाला तिकीट न मिळाल्यामुळं ते नाराज होते. मात्र, पंतप्रधान मोदींशी झालेल्या संवादानंतर त्यांनी राज्यात भाजपच्या विजयासाठी एकदिलानं काम करण्याची ग्वाही दिलीये. आम्ही जिंकू, फक्त तुमच्या आशीर्वादाची गरज असल्याचं त्यांनी पंतप्रधानांना सांगितलंय. त्यामुळं ईश्वरप्पांची नाराजी दूर झाल्याचं बोललं जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वीज गेली, मेणबत्तीच्या उजेडात रुग्णावर उपचार करण्याची वेळ; सरकारी रुग्णालयातला धक्कादायक प्रकार, VIDEO VIRAL

Duleep Trophy Final : तिलक वर्मा एकटा लढला, शतकाला एका धावेने हुकला; इशानच्या संघाकडे ३७२ धावांची आघाडी Video

रिल्सचा नाद, इंटरनेट सारखं बंद पडल्यानं व्हिडीओ अडकायचे; ५२ वर्षीय महिलेनं उचललं टोकाचं पाऊल

बापरे! कांदा-लसूण सुद्धा खात नाही अक्षय कुमार; दर सोमवारी असतो उपवास, नक्की कारण काय?

Marathi News Live Updates : पुण्यात एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांने उचलले टोकाचं पाऊल

SCROLL FOR NEXT