karnataka assembly election result 2023
karnataka assembly election result 2023 Esakal
देश

Karnataka Election Result 2023: कर्नाटकात काँग्रेसला स्पष्ट बहुमत; ४३ टक्के मतं घेत भाजपला धोबीपछाड

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभा निवडणुका निकाल आज जाहीर झाला. यामध्ये काँग्रेसनं बहुमताचा आकडा पार केल्याचं निवडणूक आयोगानं जाहीर केलं आहे. तर भाजप सत्ता राखण्यात अपयशी ठरला आहे. प्रचारादरम्यान बजरंग बली, केरळ स्टोरी, टक्केवारीचं सरकार हे प्रमुख मुद्दे गाजले. (Karnataka Election Result 2023 Congress got clear majority in Karnataka BJP defeated)

निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, कर्नाटक विधानसभा निवडणुकीत २२४ जागांपैकी ११३ जागा बहुमताचा आकडा आहे. हा आकडा काँग्रेसनं पार केला असून १३६ जागांवर काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर भाजपनं ६५ जागा जिंकल्या आहेत. तर जनता दल सेक्युलर या पक्षाला १९ जागा मिळाल्या आहेत. दोन जागांवर अपक्ष आणि प्रत्येकी एका जागेवर कल्याण राज्य प्रगती पक्ष आणि सर्वोदय कर्नाटक पक्ष यांच्या उमेदवारांचा विजय झाला आहे.

दरम्यान, पक्षनिहाय मतांची विभागणी पाहिल्यास यामध्ये काँग्रेसला ४२.९८ टक्के, भाजपला ३५.९१ टक्के तर जेडीएसला १३.३३ टक्के मतं मिळाली आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसला ०.२७ टक्के आणि नोटाला ०.६९ टक्के मतं मिळाली आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zakia Wardak: अफगाणिस्तानी अधिकारी करायची तस्करी, दुबईहून 19 कोटींचे सोने आणताना मुंबईत पकडले

'पवित्र ग्रंथ गुरु साहिब'ची पानं गुरुद्वारात घुसून फाडली! जमावाच्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू

Nick Jonas: देसी गर्ल प्रियांका चोप्राचा पती निक जोनासची तब्येत बिघडली; व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

Job Discrimination : मुंबईत नोकरी, पण मराठी माणसालाच नो एन्ट्री? लिंक्डइनवरील पोस्ट होतेय व्हायरल

Latest Marathi News Live Update :उद्धव ठाकरे यांची आज अलिबागमध्ये सभा

SCROLL FOR NEXT