karnataka election people broke 2 evms and vvpat over rumours of EVM was found in a BJP MLA Car  
देश

Karnataka Election : भाजप आमदाराकडून EVM मध्ये फेरफार? गाडीवर हल्ला करत नागरिकांनी फोडल्या मशीन, Viral Video

रोहित कणसे

कर्नाटक विधानसभा निवडणूक 2023 साठी बुधवारी संपूर्ण राज्यात मतदान पार पडले. मतदानादरम्यान कोणताही त्रास होऊ नये आणि निवडणूक शांततेत पार पडावी यासाठी निवडणूक आयोग आणि जिल्हा प्रशासनाने कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.

दुसरीकडे, कर्नाटकच्या विजयपुरा जिल्ह्यातील बसवनबागवाडी येथे लोकांनी दोन ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट फोडल्याचा प्रकार समोर आला आहे.

या घटनेचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये लोक रागाने गाडीच्या ट्रंकमध्ये ठेवलेले ईव्हीएम मशीन बाहेर काढताना आणि तोडताना दिसत आहेत. व्हिडीओ शेअर करणाऱ्या व्यक्तीच्या म्हणण्यानुसार, भाजप आमदाराच्या गाडीमध्ये ईव्हीएम मशीन सापडल्याने तरसे इव्हीएममध्ये फेरफारीच्या अफवेमुळे लोकांनी ईव्हीएम वाहनावर हल्ला केला. त्यानंतर त्यांनी ईव्हीएम मशीन फोडली.

मिळालेल्या माहितीनुसार, विजयपुरा जिल्ह्यातील बसवना बागेवाडी तालुक्यातील मसाबिनल गावात, अनेक संतप्त ग्रामस्थांनी काही इलेक्ट्रॉनिक व्होटींग मशिन , व्हीव्हीपॅट (व्होटर व्हेरिफायेबल पेपर ऑडिट ट्रेल) मशीन्स आणि मतदान अधिकाऱ्यांच्या वाहनांची तोडफोड केली आणि त्यांची नासधूस केली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अफवा पसरल्यानंतर हा प्रकार घडाल. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी बुधवारी राज्यभरात किमान तीन ठिकाणी हिंसक घटना घडल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vat Purnima : आज वटपौर्णिमा; सकाळी ६ ते १०.३० हा पूजेसाठी उत्तम कालावधी, दुपारी १२.०८ ते १२.५९ या वेळेतही करता येईल पूजा; भद्रा काळ वर्ज्य नाही

Petrol-Diesel Rate Today: 29 जूनला देशभरात पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर! मुंबई-पुण्यात 1 लिटरसाठी किती रुपये मोजावे लागणार?

Khidrapur Kopeshwar Temple : अद्‌भूत शिल्पकलेसाठी प्रसिद्ध असलेलं ऐतिहासिक कोपेश्वर मंदिर पर्यटकांसाठी सुरू; पण आंदोलन कायम, काय आहे कारण?

Pune News : पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी ‘सकाळ’चे उमेश शेळके

Kedgaon Crime : गर्भलिंगनिदान रॅकेटचा मोबाइल व्हॅनद्वारे विस्तार; मुख्य सूत्रधार अद्याप पोलिसांच्या हाती लागेना

SCROLL FOR NEXT