karnataka goa dispute over dams Kalsa-Banduri Mandovi River politics sakal
देश

कर्नाटकचा आता धरणांवरून गोव्याशी “पंगा'

मुख्यमंत्री सावंत रातोरात दिल्लीत दाखल

मंगेश वैशंपायन

नवी दिल्ली : महादयी नदीवर कर्नाटक तर्फे बांधण्यात येणाऱ्या कळसा-बांदुरी या दोन प्रस्तावित धरणांच्या सविस्तर प्रकल्प अहवालांना (डीपीआर) केंद्राकडून मंजुरी मिळाल्यानंतर दोन्ही राज्यातील वाद चांगलाच पेटला असून, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत राज्यातील सर्वपक्षीय शिष्टमंडळासह गृहमंत्रीअमित शहा यांची भेट घेण्यासाठी आज रात्री दिल्लीत झाले आहेत.

शहा यांच्याबरोबरच्या चर्चेमध्ये गोव्याचे शिष्टमंडळ, “कर्नाटकाला या नदीवरील दोन्ही प्रस्तावित धरणे बांधण्याची परवानगी केंद्राने मागे घ्यावी” असे साकडे घालणार आहे. आज रात्री उशिरा किंवा उद्या चर्चा होणार असल्याचे समजते.

महाराष्ट्राबरोबरचा सीमावाद ताजा असतानाच कर्नाटकने आता या धरणाच्या निमित्ताने गोव्याची कुरापत काढली आहे. महादयी नदीवरील कर्नाटक बांधू पाहत असलेल्या या दोन धरणांमुळे या नदीचा प्रवाहच वळणार असून त्यामुळे दक्षिण गोव्यात पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे.

असे असूनही केंद्राने आगामी निवडणुका तोंडावर आलेल्या कर्नाटकला या धरणांबाबत “गो अहेड” असा हिरवा कंदील दाखवल्याने गोवेकर यामध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार शहा यांनी सुमारे पंधरा दिवसांपूर्वी मुख्यमंत्री सावंत यांना अचानक दिल्लीत बोलवून घेतले आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री भाजपचे संघटनमंत्री बी एल संतोष आणि अन्य नेत्यांच्या उपस्थितीत संयुक्त बैठक घेऊन, महादई नदीवर कर्नाटकला धरणे बांधण्यासाठी आम्ही मंजुरी देत आहोत, असे स्पष्ट सांगितले.

त्यानंतर सावंत बचावाच्या पवित्र गेले आहेत. राज्यात भाजप आघाडीचे सरकार चालवत असतानाच हे नवे विघ्न आल्याने मुख्यमंत्री सावंत त्यांनी राज्यातील शिष्टमंडळासह दिल्लीत केंद्रीय नेतृत्वाशी विनंतीवजा चर्चा करण्यासाठी आज रात्री दिल्ली गाठली. मात्र दिल्लीत पत्रकारांशी बोलण्याचे त्यांनी सातत्याने टाळले.

सावंत यांच्या नेतृत्वाखालील मंत्रीगटातील सदस्य, खासदार श्रीपाद नाईक आणि विनय तेंडुलकर, विधानसभेचे अध्यक्ष रमेश तोरडकर, आरोग्यमंत्री विश्वजीत राणे, मगो पक्षाचे नेते सुधीर ढवळीकर आदींच्या शिष्टमंडळाने शहा यांची भेट घेतली.

ही धरणे बांधण्याच्या कर्नाटकच्या हालचालींना विरोध करणारा ठराव सरकारने मंजूर केला आहे. त्यानंतरही केंद्राने कर्नाटकला धरणे बांधण्यासाठी परवानगी दिल्याने गोव्यात अस्वस्थता आहे.

मुख्यमंत्री सावंत यांच्या दिल्ली दौऱ्याचे “दृश्य कारण” कर्नाटक बरोबरचा पाणी तंट हे सांगितले जात असले तरी शहा यांच्या भेटीमागे खरे कारण वेगळे असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. गोव्यात काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले जे 8 आमदार आहेत त्यांना प्रमोद सावंत मंत्रिमंडळात अद्याप मंत्रिपदे किंवा महामंडळे यापैकी काहीही देण्यात आलेले नाही .त्यामुळे त्यांच्यातही प्रचंड अस्वस्थता आहे. या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा छुपा अजेंडा सावंत यांच्या ताज्या दौऱ्यामागे असण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pak Rapper Indian Flag : पाक रॅपरने शो मध्ये फडकवला 'तिरंगा'! पाकिस्तानात संतापाची लाट, व्हिडिओ व्हायरल, काय घडलं नेमकं?

WPL 2026 Date: मोठी बातमी! महिला प्रीमियर लीग २०२६ कधीपासून सुरू होणार? तारीख आली समोर

नॅशनल क्रश झाल्यानंतर दोन दिवसात गिरीजा ओकचे किती फॉलोवर्स वाढले? आकडा वाचून भुवया उंचावतील

१० वी पास...१० वर्षांचा प्रिटिंगचा अनुभव...YouTube बघून तयार केल्या बनावट नोटा अन्...; पठ्ठ्याची करामत वाचून व्हाल थक्क

Mumbai News: मुंबईला जागतिक दर्जाचे टनेल मत्स्यालय मिळणार! कुठे अन् कधी पूर्ण होणार? बीएमसीने संपूर्ण योजना सांगितली

SCROLL FOR NEXT