Gau Raksha esakal
देश

Gau Raksha : आता 'गो रक्षणा'साठी पगारातून पैसे होणार कपात; भाजप सरकारचा मोठा निर्णय!

संतोष कानडे

Karnataka: कर्नाटकमधील भाजप सरकारने गो रक्षणासाठी नवा निर्णय घेतला आहे. यामध्ये सर्व सरकारी कर्मचाऱ्यांचा एक दिवसाचा पगार कापला जाणार आहे. तो पैसा गाईंच्या रक्षणासाठी वापरला जाईल.

मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या नेतृत्वातील सरकारने एक आदेश काढला आहे. सरकारी कर्मचाऱ्यांची एक दिवसाची पगार कपात होणार आहे. हा पैसा गो संरक्षणासाठी कामी आणला जाणार जाईल. कर्नाटक राज्याच्या वित्त विभागाने यासंबंधी आदेश काढला आहे.

हेही वाचाः का आहे जैन आणि हिंदु धर्मियांत साहचर्य?

''पुण्यकोटी दत्तु योजना'' या नावाने ही मोहीम राबवली जाणार आहे. भाजपशासित राज्यांमध्ये गो संरक्षणासाठी ही योजना सुरु केली जात आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनामधून एकवेळ ही रक्कम कपात होईल. या वेतन कपातीमधून राज्य सरकार ८० ते १०० कोटी रुपये निधी उभा करणार आहे. खरं तर ही योजना मागच्या वर्षीच सुरु झालेली आहे. या योजनेच्या माध्यमातून नागरिकांना गो-पालनासाठी प्रवृत्त करण्यात येत आहे.

कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात झालेला निधी पशुसंवर्धन विभागाकडे सुपूर्द करण्यात येणार असल्याचं सरकारने सांगितलं. यापूर्वी या योजनेमध्ये ऐच्छिक दान करण्याचा पर्याय होता. मात्र आता कर्मचाऱ्यांच्या पगारातून पैसे कपात होणार आहेत.

...तर कारण सांगावं लागेल

ज्या कर्मचाऱ्यांना अशी कपात नको असेल त्यांना याचं कारण द्यावं लागले. आपल्या विभागप्रमुखांना याबाबत अर्ज करावा लागणार आहे. २५ नोव्हेंबरपूर्वी याबाबत विभागप्रमुखांना लेखी कळवावं लागणार आहे. शिपाई, स्वच्छता कर्मचारी आणि डी ग्रेड कर्मचाऱ्यांना यातून मुभा मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT