PM Narendra Modi Radisson Blu Hotel esakal
देश

Karnataka Government : 'PM मोदींच्या हॉटेलमधील मुक्कामाचे 80 लाखांचे बिल काँग्रेस सरकार भरणार'; काय आहे कारण?

एनटीसीएने केवळ तीन कोटी रुपये दिले होते. हॉटेलने वन विभागांना पत्र लिहिले.

सकाळ डिजिटल टीम

स्थानिक अधिकाऱ्यांनी कार्यक्रमाच्या समन्वयासाठी एनटीसीएला मदत केली होती. आता बिल भरून, आम्ही गोंधळ संपवणार आहोत.

बंगळूर : केंद्र सरकारचे राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण (National Tiger Conservation Authority) ‘प्रकल्प टायगर’च्या ५० वर्षांच्या स्मरणार्थ गेल्या वर्षी एप्रिलमध्ये म्हैसूर येथे आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या मुक्कामाचे ८० लाखांचे न भरलेले हॉटेल बिल राज्य सरकार भरणार आहे, अशी माहिती कर्नाटकचे वनमंत्री ईश्वर खांड्रे यांनी सोमवारी दिली. रॅडिसन ब्लू हॉटेलचे (Radisson Blu Hotel) प्रलंबित बिल न भरल्याबद्दल ते त्यांच्या कार्यालयात पत्रकारांशी बोलत होते.

‘प्रोजेक्ट टायगर’ची ५० वर्षे साजरी करण्याचा कार्यक्रम एनटीसीएने आयोजित केला होता. जेव्हा कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या (Karnataka Assembly Elections) पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहिता लागू होती. या कार्यक्रमात राज्य सरकारने भाग घेतला नाही. तथापि, हॉटेलचे बिल (Hotel Bill) मात्र सरकार भरेल.

या संपूर्ण कार्यक्रमासाठी तब्बल ६.३३ कोटी रुपये खर्च आला होता; पण एनटीसीएने केवळ तीन कोटी रुपये दिले होते. हॉटेलने वन विभागांना पत्र लिहिले. कारण स्थानिक अधिकाऱ्यांनी कार्यक्रमाच्या समन्वयासाठी एनटीसीएला मदत केली होती. आता बिल भरून, आम्ही गोंधळ संपवणार आहोत, असे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Railways : पुणे, मुंबई, कोल्हापूरहून धावणाऱ्या 8 एक्स्प्रेस गाड्यांना जानेवारी 2026 पासून मिळणार 'LHB' डबे

Ravindra Jadeja: एमएस धोनीची जडेजासोबत राजस्थानमध्ये ट्रेड होण्यापूर्वी नेमकी काय चर्चा झाली? समोर आली अपडेट

Mumbai Crime: मध्यरात्री फिरताना २७ वर्षीय फ्रेंच तरुणीसोबत तरूणानं नको ते कृत्य केलं अन्...; मुंबईत नेमकं काय घडलं?

VIP Mobile Number Process : घरबसल्या तुम्हाला मिळेल VIP मोबाईल नंबर; 10 मिनिटात कन्फर्म फ्री रजिस्ट्रेशन, सीक्रेट ट्रिक पाहा

डिझेल टँकरला बस धडकली, मदिनाला निघालेले हैदराबादचे ४२ यात्रेकरू होरपळले, फक्त बसचा ड्रायव्हर वाचला

SCROLL FOR NEXT