Karnataka govt introduces standardized fares for taxi services Ola Uber Cab Services marathi News  
देश

Cab Fare Fixed : कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय! टॅक्सी सर्व्हिसचे भाडे केलं फिक्स; आता ओला, उबरसह सर्वांचे एकच रेट

Cab Fare Fixed : कर्नाटक सरकारने ओला आणि उबेर सारख्या ऑनलाइन टॅक्सी सेवांसाठी तसेच राज्यातील इतर टॅक्सी सेवांसाठी फिक्स भाडे लागू करण्याता निर्णय घेतला आहे

रोहित कणसे

Cab Fare Fixed : कर्नाटक सरकारने ओला आणि उबेर सारख्या ऑनलाइन टॅक्सी सेवांसाठी तसेच राज्यातील इतर टॅक्सी सेवांसाठी फिक्स भाडे लागू करण्याता निर्णय घेतला आहे. शहरातील वेगवेगळ्या टॅक्सी सेवांमध्ये जास्त पैसे आकारण्याच्या समस्या सोडवण्यासाठी एकसमान भाडे आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्य परिवहन विभागाने शनिवारी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार वाहनांच्या किमतीनुसार हबे भाडे विभागण्यात आले आहे. दरांमध्ये किमान भाडे आणि प्रति किलोमीटर अतिरिक्त शुल्क देण्यात आले आहे.,

वाहनांच्या किमतीनुसार भाडे तीन श्रेणींमध्ये विभागण्यात आले आहे. 10 लाखांपर्यंतच्या वाहनांचे किमान भाडे 4 किमीसाठी 100 रुपये ठेवण्यात आले आहे, त्यानंतर प्रत्येक जास्तीच्या किलोमीटरसाठी 24 रुपये आकारले जातील.

त्याचप्रमाणे, 10 ते 15 लाख रुपये किंमतीच्या वाहनांसाठी, 4 किमीसाठी किमान भाडे 115 रुपये ठेवण्यात आले आहे आणि त्यापुढील अतिरिक्त किलोमीटरसाठी 28 रुपये भाडे आकारले जाईल.

15 लाखांपेक्षा जास्त किमतीच्या वाहनांसाठी, 4 किमीसाठी किमान 130 रुपये भाडे आकारले जाईल, त्यानंतर पुढील अतिरिक्त किलोमीटरसाठी 32 रुपये भाडे आकारले जाईल.

या अधिसूचनेत याप्रमानेच, सामान तसेच वेटिंग रेट आणि रात्रीच्या प्रवासासाठी आकारली जाणारी जास्तीचे शुल्क याविषयी देखील मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत.

आता प्रवाशांना 120 किलोपर्यंत सामान मोफत नेता येणार आहे, त्यानंतर अतिरिक्त 30 ग्रॅम सामानासाठी 7 रुपये शुल्क आकारले जाईल. तसेच पहिल्या 5 मिनिटांसाठी वेटिंग चार्ज नसेल, त्यानंतर प्रति मिनिटासाठी 1 रुपये शुल्क आकारले जाईल, असे अधिसूचनेत म्हटले आहे.

सकाळी 12 ते सकाळी 6 दरम्यान चालणाऱ्या टॅक्सींना 10 टक्के अतिरिक्त शुल्क द्यावे लागेल. तसेच अधिसूचनेत पुढे म्हटले आहे की प्रवाशांकडून जीएसटी टोल शुल्क वसूल केले जाऊ शकते, परंतु वेळेच्या आधारावर कोणतीही वसुली केली जाऊ शकत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jammu Kashmir : पूंछमध्ये LoC जवळ मोठा स्फोट; लष्कर-ए-तोयबाचा कमांडर मोहम्मद फैजानसह चौघांचा मृत्यू

IND A vs NZ A: न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारताच्या संघात मोठा बदल; रिषभ पंत बाहेर, तर २१ वर्षांचा खेळाडू घेणार जागा

Latest Marathi News Live Update : पुण्यात पाण्याचं संकट! गुरुवारपासून १० टक्के कपात, आठवड्यातून एक दिवस पाणी बंद

Success Story: २ खोल्यांचे घर, ४ भावंडांचे यूपीएससीत यश! कुणी आयएएस तर कुणी आयपीएस बनले

Akola News : नवरात्रीत अकोला पोलिसांकडून नागरिकांना दिलासा! २ कोटी २८ लाखांचा मुद्देमाल परत; ५२६ मोबाईल, ५० वाहने, सोन्याचे दागिने आणि रोख रकमेचा समावेश

SCROLL FOR NEXT