Twitter MD Manish Maheshwari File Photo
देश

गाझियाबाद मारहाण : ट्वीटर इंडियाच्या एमडीला हायकोर्टाचा दिलासा!

भडकाऊ व्हिडिओ डिलिट न केल्याने पोलिसांनी पाठवली होती नोटीस

Amit Ujagare (अमित उजागरे)

बंगळुरु : उत्तर प्रदेशातील गाझियाबाद (Gaziabad) जिल्ह्यात एका वृद्ध मुस्लीम व्यक्तीला मारहाण करुन त्याची दाढी कापल्याप्रकरणी ट्वीटर इंडियाचे एमडी मनिष माहेश्वरी यांना कर्नाटक हायकोर्टानं तात्पुरता दिलासा दिला आहे. गाझियाबाद पोलीस माहेश्वरी यांच्याशी सक्तीनं वागू शकत नाही, असं हायकोर्टानं म्हटलं आहे. (Karnataka High Court grants interim relief to Twitter MD Manish Maheshwari)

बुलंदशहर येथील रहिवासी असलेल्या एका वृद्ध तांत्रिक मुस्लीम व्यक्तीला लोनी येथे मारहाण करुन त्याची दाढी कापल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. याप्रकरणी ट्विटर इंडियाचे एमडी मनीष माहेश्वरी यांना चौकशीसाठी गुरुवारी लोनी येथे पोलीस ठाण्यात हजर व्हायचं होतं. पण ते हजर होऊ शकले नाहीत, कारण त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी कर्नाटक हायकोर्टात याचिका दाखल केली होती. हायकोर्टानं याप्रकरणी सुनावणी करताना गाझियाबाद पोलिासांना म्हटलं की, "आपण अशा प्रकारे चौकशीसाठी प्रत्यक्ष पोलीस ठाण्यात हजर राहण्याची सक्ती करु शकत नाही. तर व्हिडिओ कॉन्फरन्सींगद्वारे चौकशी करावी." माहेश्वरी यांनी आपली बाजू मांडताना कोर्टात म्हटलं की, "त्यांचा कंपनीच्या संचालकांमध्ये समावेश नाही. कंपनीचे संचालक परदेशात आहेत. आपण इथे केवळ सेल्स आणि मार्केटिंगचं काम पाहतो. त्यामुळे ट्विटवर कशा प्रकारचा कंटेन्ट टाकला जात आहे याची जबाबदारी आपली नाही." माहेश्वरी यांची बाजू ऐकून घेतल्यानंतर गाजियाबाद पोलिसांना माहेश्वरी यांच्यावर चौकशीखाली सक्तीनं वागता येणार नाही असं सांगितलं.

काय आहे प्रकरण?

५ जून रोजी बुलंदशहरच्या अनुपशहर येथील वृद्ध मांत्रिक अब्दुल समद यांना मारहाण करत त्यांची दाढी कापण्यात आली होती. त्यानंतर १४ जून रोजी या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काही लोकांनी याला जातीय स्वरुप देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी १५ जून रोजी ट्वीटरसह ९ लोकांविरोधात धार्मिक उन्माद पसरवल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. यामध्ये आरोप करण्यात आला होता की, पोलिसांनी सांगितल्यानंतरही ट्वीटरने हे भडकाऊ ट्वीट डिलीट केलं नाही.

'ट्वीटरला पाठवली होती नोटीस

यानंतर गाझियाबाद सायबर सेलने १६ जून रोजी अमेरिकास्थित ट्वीटरच्या मुख्यालयाला नोटीस पाठवून भडकाऊ ट्वीट करणाऱ्या आरोपींची डिटेलसह १२ प्रश्नांची उत्तर मागितली होती. त्याचबरोबर १७ जून रोजी लोनी बॉर्डर पोलिसांनी ट्वीटर इंडियाच्या एमडींना नोटीस पाठवून एका आठवड्यात पोलीस ठाण्यात येऊन जबाब नोंदवण्याचे निर्देश दिले होते. यावर ट्वीटर इंडियाचे एमडी मनीष माहेश्वरी यांनी पोलिसांना पत्र लिहून त्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सींगद्वारे चौकशी करण्याची विनंती केली होती. मात्र, गाझियाबाद पोलिसांनी त्यांची ही विनंती धुडकावत त्यांना दुसरी नोटीस पाठवून २४ जून रोजी हजर राहण्याचे निर्देश दिले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DCM Sunetra Pawar : वारकऱ्यांसाठी सर्वोत्तम सुविधा उपलब्ध करा; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे आदेश

Yavatmal News : सहकार क्षेत्रात खळबळ! जिल्हा बँकेतील संशयास्पद व्यवहारांवर चौकशीचे आदेश

Farmer Tragedy: आडगाव खुर्दमध्ये वादळी वाऱ्याने शेडची भिंत कोसळली; शेतकरी बाप-लेकाचा मृत्यू, पुतण्या गंभीर

Elon Musk: इलॉन मस्क बनले जगातले पहिले ट्रिलियनियर! 'स्पेसएक्स'च्या IPO ने केलं मालामाल

Paithan News : गोदावरी नदीच्या पात्रात अंघोळ करताना आई व बहिणीसमोरच पाण्यात बुडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

SCROLL FOR NEXT