Hijab laws Sakal
देश

Hijab Case: वाद राष्ट्रीय पातळीवर पसरवू नका - सर्वोच्च न्यायालय

कर्नाटकातील हिजाब वादाशी संबंधित एका याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने आज तातडीने सुनावणी घेण्याची मागणी फेटाळून लावली.

सकाळ वृत्तसेवा

बंगळूर : कर्नाटकातील हिजाब वादाशी संबंधित एका याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने आज तातडीने सुनावणी घेण्याची मागणी फेटाळून लावली. या गोष्टी राष्ट्रीय स्तरावर पसरवू नका. आम्ही योग्य वेळी हस्तक्षेप करू, असे सरन्यायाधीश एन. व्ही. रमण यांनी तातडीने सुनावणी नाकारताना सांगितले. (Karnataka Hijab Case)

शाळा आणि महाविद्यालयांत हिजाबवर निर्बंध असल्याच्या प्रकरणात कर्नाटक उच्च न्यायालयाने विद्यार्थ्यांना धार्मिक वस्त्रे परिधान करणे टाळण्यास सांगितले आहे. त्यानंतर कर्नाटकातील एका मुलीने गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. महाविद्यालयांतील हिजाबच्या निर्बंधांना आव्हान देणाऱ्या याचिकेवर कर्नाटक उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. काल (ता. १०) तीन सदस्यीय खंडपीठाने सोमवारी (ता. १४) पुन्हा सुनावणी सुरू करणार असल्याचे सांगितले.

उच्च न्यायालयाच्या टिप्पण्यांना आव्हान देणाऱ्‍या विद्यार्थिनीचे म्हणणे आहे, की तिची प्रात्यक्षिक परीक्षा १५ फेब्रुवारीपासून सुरू होईल आणि शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रवेशावरील कोणताही हस्तक्षेप त्यांच्या शिक्षणावर परिणाम करू शकतो. विद्यार्थिनी फातिमा बुशरा हिनेही काल (ता. १०) सर्वोच्च न्यायालयात स्वतंत्र याचिका दाखल केली होती; परंतु सर्वोच्च न्यायालयाने तिची याचिका दाखल करून घेतली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सचिनचा 'अजिंक्य' मानला जाणारा विक्रम मोडला जाणार? ECB चा मास्टरस्ट्रोक, Joe Root सोबत केला खास करार

Yavatmal News : शिंदेसेनेचा गड आला, पण सिंह गेला! मध्यवर्ती बँकेत शिंदेसेना ठरली युतीत ‘मोठा भाऊ’; काँग्रेसची सत्ता उलथवली, प्रतिष्ठेच्या लढतीत दिग्गजांना धक्के

Karmad News : पीएम धन-धान्य कृषी योजनेतील कामगिरीबद्दल जिल्ह्याचा दिल्लीत गौरव

Ramlila Maidan Protest: रामलीला मैदानाचं एका दिवसाचं भाडं 1 लाख 21 हजार रुपये; पण यावर्षी केवळ तीनच दिवस उपलब्ध

MPSC Student Agitation : आंदोलन थांबले, पण असंतोष कायम; ‘एमपीएससी’ अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी अपूर्णच

SCROLL FOR NEXT