Karnataka Hijab Controversy
Karnataka Hijab Controversy esakal
देश

हिजाब वादाचे महाराष्ट्रात पडसाद; सोलापूर-विजापूर महामार्गावर 'रास्ता रोको'

सकाळ डिजिटल टीम

हिजाब विरुद्ध भगवा असा वाद कर्नाटकमध्ये पेटलाय.

Karnataka Hijab Controversy : हिजाबच्या वादावरून (Karnataka Hijab Disputes) कर्नाटक राज्यात वातावरण तापलं असताना आता याचे पडसाद महाराष्ट्र राज्यातही उमटण्यास सुरुवात झालीय. सोलापूर-विजापूर महामार्गावर (Solapur-Vijapur Highway) रास्ता रोको करण्यात आला असून पोलीस हे आंदोलन रोखण्याचा प्रयत्न करत आहेत. सध्या या मार्गावर तणावपूर्ण वातावरण पहायला मिळतंय.

हिजाब विरुद्ध भगवा असा वाद कर्नाटकमध्ये पेटलाय. त्यामुळे कर्नाटक मधल्या शाळा आणि महाविद्यालय तीन दिवसांसाठी बंद ठेवण्यात आल्या आहेत. मात्र, या वादाचे पडसाद केवळ कर्नाटक राज्यापुरते मर्यादित राहिले नाहीत, तर थेट महाराष्ट्रात पोहोचले आहेत. बीडमध्ये आता हिजाबच्या समर्थनार्थ एमआयएम पक्षाच्या वतीनं बॅनर लावण्यात आले आहेत.

कर्नाटकमधील (Karnataka) एका सरकारी कॉलेजमध्ये (government college) काही मुस्लीम मुलींनी हिजाब घातल्याने त्यांना महाविद्यालयामध्ये प्रवेश नाकारण्यात आल्याची घटना घडलीय. कर्नाटकातील उडपी येथील कुंदापूर परिसरातील ‘पीयू’ महाविद्यालयामध्ये हा प्रकार घडला आहे. या प्रकारामुळे हे कॉलेज आता चांगलेच चर्चेत आले आहे. हिजाबवरून वाद निर्माण झाल्यानंतर कर्नाटकचे शिक्षण मंत्री बीसी नागेश (Education Minister BC Nagesh) यांनी यावर प्रतिक्रिया दिलीय. हा वाद 20 दिवसांपूर्वी सुरू झाला आहे, त्यापूर्वी या महाविद्यालयात येणाऱ्या मुली या हिजाब घालत नव्हत्या, असे नागेश यांनी म्हटलंय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Israel Hamas War : रमजानमध्ये संदेशवाहक पाठवून युद्ध थांबले, इस्राईल-हमास युद्धावर पंतप्रधान मोदींचं मोठं वक्तव्य

Latest Marathi News Live Update : उद्या जर बिभव स्वतः आले नाहीत तर...स्वाती मालीवाल प्रकरणात महिला आयोग आक्रमक!

खासदारांच्या दिलदार मित्रानेच चंद्रहार पाटलांचा बळी दिला; विशाल पाटलांनी कोणावर केला गंभीर आरोप

Dry Day: मायानगरीचा विकेंड कोरडाच! मुंबई आणि परिसरात 3 दिवस ड्राय डे, काय आहे कारण?

नळातून किंवा शॉवरमधून पाणी येत नसेल तर घरच्या घरी 'असे' करा दुरुस्त

SCROLL FOR NEXT