Karnataka Hijab Row Sakal
देश

वर्गात हिजाब काढेन, पण शाळेत घ्या; विनंती करूनही नाकारला प्रवेश

सकाळ डिजिटल टीम

बंगळुरू : हिजाबवरून राजकारण तापल्यानंतर कर्नाटकमध्ये (Karnataka Hijab Row) शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्यात आले होते. पण, आज शाळा आणि महाविद्यालये पुन्हा सुरू करण्यात आले. यावेळी काही विद्यार्थिनी शाळेत हिजाब घालून आल्या. मात्र, पुन्हा शाळेने त्यांना प्रवेश नाकारला. मांड्या येथील शाळेबाहेर पालक आणि शिक्षकांमध्ये वाद झाल्याचे देखील पाहायला मिळाले.

एक विद्यार्थिनी मांड्या येथील रोटरी स्कूलमध्ये हिजाब घालून आली. तिचे वडील तिला सोडायला आले होते. यावेळी शाळेच्या प्रवेशद्वारावर असलेल्या शिक्षिकेने त्यांना रोखले. त्यानंतर वडिलांनी शाळेत घेण्याची विनंती केली. वर्गात गेल्यानंतर मुलगी हिजाब काढेन. पण तिला शाळेत घ्या, अशी विनंती वडिलांनी केली. तरीही शिक्षिकेने विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला, असं पालकांनी सांगितलं. याबाबत एएनआयने वृत्त दिले आहे.

नेमका वाद काय? -

कर्नाटकमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून हिजाबचा वाद सुरू झाला आहे. उडपी येथे हिजाब घातलेल्या विद्यार्थिंनींना महाविद्यालयात प्रवेश नाकारण्यात आला. त्यानंतर त्यांनी शिक्षण विभागाकडे तक्रार केली. मात्र, विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाच पालन करावं लागेल, असं सरकारने सांगितलं. त्यानंतर विद्यार्थिनींनी न्यायालयात धाव घेतली. पण, विद्यार्थिनी हिजाब घालून आल्या, तर आम्ही भगवे शेले घेऊन येऊ अशी भूमिका हिंदूत्ववादी विद्यार्थ्यांनी घेतली होती. त्यानंतर हा वाद अधिक तीव्र झाला.

फेब्रुवारीमध्ये चिघळला वाद -

सुरुवातीला उडुपीमधून सुरू झालेला वादाचे पडसाद हे आजूबाजूच्या जिल्ह्यात देखील उमटले. अनेक महाविद्यालयांनी हिजाब घातलेल्या विद्यार्थिनींना प्रवेश नाकारला. त्यानंतर विद्यार्थिनी आक्रमक झाल्या. काही दिवसांपूर्वी हिजाब घातलेल्या एका विद्यार्थिनीला भगवे शेले घातलेल्या विद्यार्थ्यांनी घेराव घातला. त्यानंतर हिजाब वादावर देशभरातून टीका झाली. वाद अधिक चिघळल्याने कर्नाटक सरकारने शाळा-महाविद्यालये बंद ठेवली होती. आता पुढील निर्देश येईपर्यंत शाळेत गणवेशात जावे, असे आदेश कर्नाटक उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानंतर शाळा-महाविद्यालये सुरू करण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT