karnataka hijab row attack on petitioner girl family  Bank refuses to pay the student for wearing hijab
देश

Hijab Row : याचिकाकर्त्या मुलीच्या कुटुंबीयांवर हल्ला? भाऊ गंभीर जखमी

सकाळ डिजिटल टीम

बंगळुरू : कर्नाटकातील हिजाब वाद (Karnataka Hijab Row) अद्यापही शांत झालेला नाही. हिजाब परिधान करण्याची मागणी करणारी याचिका कर्नाटक उच्च न्यायालयात (Karnataka High Court) दाखल केलेल्या याचिकाकर्त्या मुलीच्या कुटुंबीयांवर कथितरित्या हल्ला झाल्याचा प्रकार समोर आला आहे. यामध्ये तिचा भाऊ गंभीर जखमी झाला आहे. तसेच वडिलांच्या हॉटेलची तोडफोड करण्यात आली आहे.

हजरा शिफा, असे या याचिकाकर्त्या मुलीचं नाव आहे. हिजाब घातल्यानं महाविद्यालयात प्रवेश नाकारला होता. त्यामुळे तिने कर्नाटक उच्च न्यायालयात धाव घेतली होती. सध्या हिजाब वादावर न्यायालयात सुनावणी सुरू आहे. पण, २१ फेब्रुवारीला शिफाच्या वडिलांच्या हॉटेलवर हल्ला करण्यात आला. यामध्ये तिचा भाऊ गंभीर जखमी झाला. संघ परिवाराच्या गुंडांनी हा हल्ला केल्याचा आरोप हजरा शिफाने केला आहे. तसेच त्या लोकांवर कारवाई करण्यात मागणी देखील तिने केली आहे. याबाबत तिने ट्विट केले असून भावावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याचं सांगितलं आहे. याबाबत इंडिया टुडेनं वृत्त दिले आहे.

हजरा शिफाचं ट्विट नेमकं काय? -

“माझ्या भावावर जमावाने क्रूरपणे हल्ला केला. मी माझ्या हिजाबच्या हक्कासाठी न्यायालयात लढत आहे. तो माझा हक्क आहे. पण, आमच्यावर हल्ला करण्यात आला. यामध्ये आमच्या मालमत्तेचं नुकसान झालं आहे. माझा भाऊ जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. मी माझा हक्क देखील मागू शकत नाही का? संघ परिवाराच्या गुंडांनी हे केलं असून त्यांच्यावर कारवाई करावी. त्यांचा पुढचा बळी कोण असेल?'' असे आरोप तिने ट्विटमधून केले आहेत.

दरम्यान, गेल्या अडीच महिन्यापासून हिजाबवरून वाद सुरू आहे. फेब्रुवारी महिन्यात हा वाद टोकाला पोहोचला. हिजाब प्रकरण कर्नाटक उच्च न्यायालयात पोहोचलं असून आज दुपारी अडीच वाजता पुन्हा सुनावणी घेण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather : महाराष्ट्रात आज पावसाचा जोर वाढणार; पुणे,साताऱ्यासह 'या' जिल्ह्यांना येलो अलर्ट, तुमच्या भागात कसे असेल हवामान?

Landowners Compensation Hike: जमीनमालकांसाठी नुकसानभरपाईत वाढ, ४० वर्षांनंतर उच्च न्यायालयाचा निर्णय

TB मुक्तीसाठी 'सरपंचां'ना साकडं! गावागावांत 'हँड हेल्ड एक्स-रे'द्वारे स्क्रीनिंग; लक्षणे नसलेल्या रुग्णांना शोधून मोफत उपचार

आजचे राशिभविष्य - 16 ऑगस्ट 2026

Aries Weekly Horoscope: मेष राशीसाठी मोठी खुशखबर! जुने वाद मिटणार, नवी दारे उघडणार; 'या' दिवसांत मिळेल भाग्याची साथ

SCROLL FOR NEXT