Karnataka Education Minister on Saffron Shawl Student Heckled Hijab Girl e sakal
देश

विद्यार्थ्यांना मुस्लीम मुलीला घेराव घालायचा नव्हता, कर्नाटकच्या मंत्र्याचं वक्तव्य

सकाळ डिजिटल टीम

बंगळुरू : भगवे शेले घेतलेल्या विद्यार्थ्यांनी मुस्लीम मुलीला पाहून हुल्लडबाजी केली. हे विद्यार्थी तिला घेराव घालताना त्यामध्ये दिसत आहेत. त्याचा एक व्हिडिओ (Saffron Shawl Student Heckled Hijab Girl) समोर आला आहे. यानंतर देशभरातून संताप व्यक्त करण्यात आला. यावरून आता कर्नाटकचे शालेय शिक्षणमंत्री बी. सी. नागेश (Karnataka Education Minister) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विद्यार्थ्यांना मुस्लीम मुलीला घेराव घालायचा नव्हता, असं वक्तव्य त्यांनी केलं आहे.

कर्नाटकमधील मांड्यातील महाविद्यालयातील प्रकरणात मुलांना त्या मुस्लीम मुलीला घेराव घालायचा नव्हता. ती मुलगी जेव्हा ''अल्लाह हू अकबर'' ओरडत होती तेव्हा कोणीही तिच्या आजूबाजूला दिसत नाही. ती भडकली होती का? ''अल्लाह हू अकबर'' आणि ''जय श्री राम'' अशा घोषणा महाविद्यालय परिसरात खपवून घेणार नाही, असं बी. सी. नागेश म्हणाले.

नेमका व्हिडिओ काय? -

एक मुस्लीम विद्यार्थिनी हिजाब घालून महाविद्यालयात प्रवेश करते. त्यावेळी काही भगवे शेले घेतलेल्या विद्यार्थ्यांनी तिला घेराव घातला. तसेच ''जय श्री राम'' अशा घोषणा दिल्या. या विद्यार्थ्यांनी हुल्लडबाजी केली. त्यानंतर विद्यार्थिनीने ''अल्लाह हू अकबर'' म्हणत त्यांना उत्तर दिले.

नेमकं काय आहे प्रकरण? -

गेल्या डिसेंबर महिन्यात कर्नाटकातील उडुपीमध्ये एका महाविद्यालयात हिजाब घातलेल्या विद्यार्थिंनींना प्रवेश नाकारण्यात आला. त्यानंतर त्यांनी शिक्षण विभागाकडे तक्रार केली. पण, विद्यार्थ्यांना गणवेशात महाविद्यालयात यावं लागेल, असं शिक्षण विभागानं सांगितलं. त्यानंतर या विद्यार्थिनींनी न्यायालयात धाव घेतली. यानंतर हे प्रकरण चिघळलं. तुम्ही हिजाब घातला तर आमचे विद्यार्थी भगवे शेले घेऊन येतील, अशी भूमिका हिंदूत्ववादी संघटनांनी घेतली होती. आता हा वाद आणखी चिघळला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Koyna Dam Water Level : कोयना धरण निम्म्याहून अधिक भरलं! पण 100 टक्के भरण्यासाठी अजून किती टीएमसी पाण्याची गरज? पाहा लेटेस्ट अपडेट

IND vs ENG Weather Update: भारत-इंग्लंड शेवटच्या टी२० सामन्यात पावसाचा धुमाकूळ की होणार पूर्ण खेळ? हवामान खात्याने दिला 'हा' इशारा...

Latest Marathi News Live Update : येरवडा गणेश नगर परिसरात दोन गटांतील मुलींमध्ये जोरदार हाणामारी

Hingoli: माळसेलूत चिखल तुडवत विद्यार्थी शाळेत ; रस्त्याची दुरवस्था; पालकांत तीव्र संताप; आरोग्याचा प्रश्नही गंभीर, ग्रामपंचायतीचे दुरुस्तीकडे दुर्लक्ष

Maharashtra ATS Raids : पाकिस्तानी गुंडांशी सोशल मीडिया कनेक्शन! कोल्हापूरच्या 2 तरुणांची 10 तास कसून चौकशी; 'एटीएस'कडून राज्यभरात 112 तरुणांची झाडाझडती

SCROLL FOR NEXT