Karnataka Hijab Row Saffron Shawls Student Heckled Muslim Girl
Karnataka Hijab Row Saffron Shawls Student Heckled Muslim Girl e sakal
देश

मुस्लीम मुलगी येताच हिंदूत्ववाद्यांची हुल्लडबाजी, आव्हाडांनी शेअर केला व्हिडिओ

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : कर्नाटकमध्ये हिजाबवरून राजकारण (Karnataka Hijab Row) चांगलंच तापलं आहे. हिजाब घालून आलेल्या मुलींना महाविद्यालयात प्रवेश नाकारला जात आहे. तसेच हिंदू धर्मातील विद्यार्थी महाविद्यालयात भगवे दुप्पटे घेऊन येत आहेत. आज भगवे दुपट्टे घेतलेल्या हिंदूत्ववादी विद्यार्थ्यांनी एका हिजाब घातलेल्या मुलीला छेडले. त्याचा व्हिडिओ शेअर करत मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. (Saffron Shawls Student Heckled Muslim Girl)

नेमका व्हिडिओ काय? -

एक विद्यार्थिनी हिजाब घालून कर्नाटकातील उडपीतील पीईएस महाविद्यलयात जात होती. यावेळी भगवे दुपट्टे घेतलेल्या काही विद्यार्थ्यांनी तिला घेराव घातला आणि ''जय श्री राम'' अशी घोषणाबाजी केलीय. त्या विद्यार्थिनीची छेड काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर एका व्यक्तीने त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. तरीही विद्यार्थ्यांनी जय श्री रामची घोषणाबाजी केली. तसेच महाविद्यालय परिसरात हुल्लडबाजी केली.

जितेंद्र आव्हाड काय म्हणाले? -

हा व्हिडिओ उडपीतील पीईएस महाविद्यालयातील असून भगवे दुपट्टे घेतलेले विद्यार्थी हिजाब घालून आलेल्या मुलीची छेड काढताना दिसतात. हे तथाकथित भक्त भारताचा नक्कीच पाकिस्तान बनवतील. हे राम, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

नेमकं प्रकरण काय? -

कर्नाटकमध्ये गेल्या २ महिन्यांपासून हिजाबवरून राजकारण तापलं आहे. सर्व विद्यार्थ्यांनी शालेय गणवेशातच महाविद्यालयात यावे, असा आदेश शिक्षण विभागाने काढला आहे. त्यामुळे हिजाब घालून आलेल्या विद्यार्थिनींना महाविद्यालयात प्रवेश नाकारला जात आहे. खुद्द प्राचार्य महाविद्यालयाच्या प्रवेश दारात उभे राहून विद्यार्थिनींना घरचा रस्ता दाखवत आहेत. एका महाविद्यालयात हिजाब घातलेल्या विद्यार्थिंनींना प्रवेश तर दिला. मात्र, त्यांना वेगळ्या वर्गात बसवण्यात आलं. तसेच त्यांना कुठल्याही शिक्षकानं शिकवलं नाही. सध्या हिजाब प्रकरणाबाबत कर्नाटक उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

प्रसारणाचं धोरण नवं उत्तमातलं उत्तम हवं

सिक्स जी : भविष्यातली डिजिटल-क्रांती

SCROLL FOR NEXT