Karnataka Hijab Row ANI
देश

अखेर हिजाब घातलेल्या विद्यार्थिनींना महाविद्यालयात प्रवेश, पण...

सकाळ डिजिटल टीम

बंगळुरू : कर्नाटकमधील उडपीमध्ये हिजाबवरून (Karanataka Hijab Row) वातावरण तापलं आहे. हिजाब घातलेल्या मुलींना महाविद्यालयात प्रवेश नाकारला जात आहे. त्याविरोधात काँग्रेसने आंदोलन देखील केले. अखेर विद्यार्थिंनींना एका महाविद्यालयात हिजाब घालून येण्याची परवानगी दिली. पण, त्यातही अटी घालण्यात आल्या आहेत.

दोन दिवसांपूर्वी कर्नाटकमधील कुंदापूर (Kundapur Karnataka) येथील महाविद्यालयात हिजाब घातलेल्या विद्यार्थिंनींना महाविद्यालयात प्रवेश नाकारला होता. महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी स्वतः विद्यार्थिंनींना मुख्य प्रवेशद्वारातूनच घरचा रस्ता दाखवला होता. पण, आज याच शहरातील सरकारी शाळेत हिजाब घातलेल्या विद्यार्थिंनींना प्रवेश देण्यात आला. पण, त्यांना वेगळ्या वर्गखोलीमध्ये बसवण्यात आलं, असं वृत्त एएनआयनं दिलं आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून उडपी येथील महाविद्यालयांमध्ये हिजाब घातलेल्या विद्यार्थिंनींना प्रवेश नाकारला जातोय. त्याविरोधात काही मुस्लीम संघटना आणि काँग्रेसच्या काही नेत्यांनी आंदोलन देखील केले. पण या विद्यार्थिनी हिजाब घालून आल्या तर हिंदूंच्या विद्यार्थिनी भगवे दुप्पटे घेऊन शाळेत जातील, अशी भूमिका हिंदू संघटनांनी घेतली आहे. पण, प्रत्येक विद्यार्थ्याने शाळेच्या गणवेशात यावं, असा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार गणवेशाच्या रंगाचा हिजाब घालण्यास मुलींनी तयारी दर्शवली आहे. पण, त्यांना महाविद्यालयात प्रवेश नाकारला जात आहे.

दरम्यान, महाविद्यालय प्रशासनाच्या कोणत्याही हस्तक्षेपाशिवाय विद्यार्थ्यांना हिजाब परिधान करून वर्गात जाण्याची परवानगी देण्यासाठी कर्नाटक उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

B.Arch Admission Round 3 : बी. आर्किटेक्चर प्रवेश प्रक्रियेची तिसरी यादी जाहीर; ७५८ विद्यार्थ्यांना नवी संधी, ५३६ जणांचे ऑटो फ्रिज प्रवेश निश्चित

विदर्भासह मध्य भारतात पावसाचा अलर्ट; अतिमुसळधार पावसाचा इशारा

Sakal Impact | MPSC Drug Inspector Exam Scam: एमपीएससी औषध निरीक्षक भरतीत पेपरफुटीला दुजोरा; संपूर्ण प्रक्रिया रद्द, शुल्काविना फेरपरीक्षा जाहीर

Nepal Flood: नेपाळमध्ये पावसाविना पूर! २९१ विदेशी नागरिक बेपत्ता; १०५ भारतीयांचा समावेश, १६ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT