karnataka hoysala temples inscribed on unesco world heritage list 2023 PM Modi  
देश

UNESCO: अभिमानास्पद! कर्नाटकातील तीन मंदिरांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश; PM मोदींनी व्यक्त केला आनंद

रोहित कणसे

पश्चिम बंगाल येथील शांतिनिकेतननंतर आता कर्नाटकच्या होयसळ येथील बेलूर, हलेबिड आणि सोमनाथपुरा या मंदिरांना युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत स्थान देण्यात आले आहे. संयुक्त राष्ट्रे शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संस्था(UNESCO)ने सोमवारी याची घोषणा केली आहे. सौदी अरेबियातील रियाध येथे जागतिक वारसा समितीच्या ४५व्या सत्रादरम्यान हा निर्णय घेण्यात आला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही भारतासाठी अभिमानाची बाब असल्याचे ते म्हटले आहे. होयसळ येथील भव्य पवित्र मंदिरे युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत. होयसळ मंदिरांचे कालातीत सौंदर्य हे भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचा आणि आपल्या पूर्वजांच्या विलक्षण शिल्प कौशल्याचा पुरावा आहे, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील आनंद व्यक्त केला आहे. आपल्या देशासाठी आनंदाचा क्षण आहे की युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत आपल्या दोन सांस्कृतिक वारशांचा समावेश करण्यात आला आहे. पश्चिम बंगालमधील शांतिनेकेतन आणि कर्नाटकातील होयसळ पवित्र मंदिर समूह आपल्या संस्कृतीच्या शाश्वततेचे जिवंत पुरावे आहेत, असे शाह म्हणाले आहेत.

होयसळ मंदिर हे १२व्या-१३व्या शतकात बांधण्यात आले होते. कला आणि साहित्याचे संरक्षक मानल्या जाणाऱ्या होयसळ राजवंशाची ही राजधानी होती. ही तीन होयसळ मंदिरे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (एएसआय) अंतर्गत संरक्षित स्मारके आहेत. म्हणूनच एएसआय याची देखभाल आणि संरक्षण करते.

यापूर्वी पश्चिम बंगाल येथील शांतिनिकेतनचा देखील यूनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आला आहे. शांतिनिकेतनमध्येच कवि रवींद्रनाथ टागोर यांनी विश्वभारतीची स्थापना केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amravati News : दहा दिवसांच्या बाळावर अघोरी उपचार; गरम विळ्याने दिले ३९ चटके अन्... मेळघाटातील धक्कादायक प्रकार

Tulsi Remedies Ekadashi: आषाढी एकादशीला करा तुळशीचे 'हे' उपाय सर्व मनोकामना होतील पूर्ण

Ashadhi Wari: विदर्भातून १५९४ मध्ये निघाली पहिली पालखी; १९३८ दिंड्या पंढरपुरात,रुक्मिणी संस्थान नंतर चंदाजी महाराज दिंडीचा समावेश

Elon Musk New Party: इलॉन मस्क स्थापन करणार अमेरिकेतील तिसरा सर्वात मोठा पक्ष, डोनाल्ड ट्रम्प यांचा फायदा होणार की नुकसान?

Ashadhi Ekadashi: देहेडच्या पुरातन वटवृक्षावर ‘कान्होपात्राची महावेल’;भोकरदन तालुक्यातील विठ्ठल भक्त दर्शनासाठी करतात गर्दी

SCROLL FOR NEXT