karnataka jailed for 14 years murder case become doctor at 40 subhash patil 
देश

प्रेरणादायी : चौदा वर्षे काढली जेलमध्ये, 40व्या वर्षी बनला डॉक्टर

सकाळ डिजिटल टीम

कलबुर्गी (कर्नाटक) : आयुष्यात एखादी धक्कादायक घटना घडली तर, त्यालाच धरून न बसता पुढं चालत रहायचं असतं नवी धैय्य साध्य करायचं असतं. हा सुविचार कोणीही सांगेल. पण, तो प्रत्यक्षात उतरवणारी माणसं फार कमी असतात. कर्नाटकमध्ये अशाच एका अवलियानं सगळे अडथळे पार करत डॉक्टर होऊन दाखवलंय. वाचून धक्का बसेल कारण, ती व्यक्ती एका खुनाच्या आरोपाखाली 14 वर्षे जेलमध्ये होती.

असा झाला सुभाषचा प्रवास
कर्नाटकमध्ये कलबुर्गीमधील अफझलपुराचा रहिवासी सुभाष पाटील. वय वर्षे 40 पण, या चाळीस वर्षांत सुभाषनं खूप काही पाहिलं.

1997ला त्यानं एमबीबीएससाठी कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं होतं. डॉक्टर बनून रुग्णांची सेवा करण्याचं त्याचं धैय्य होतं. इथपर्यंत सगळं सुरूळीत सुरू होतं. पण, एका खुनाच्या आरोपाखाली त्याला अटक झाली. 2002मध्ये हे वादळ त्याच्या आयुष्यात आलं.

जेलमध्ये गेल्यानंतरही त्याची सेवाभावी वृत्ती स्वस्थ बसली नाही. त्यानं जेलच्या ओपीडीमध्ये काम सुरू केलं. त्याच्या चांगल्या वर्तनामुळं 2006मध्ये त्याची जेलमधून सुटका झाली. सुभाषला पुन्हा आपलं स्वप्न पूर्ण करण्याची संधी मिळाली.

त्यानंतर चार वर्षांत एमबीबीएसचं शिक्षण पूर्ण केलं आणि 2019मध्ये तो डॉक्टर झाला. त्यानं एक वर्षाची एंटर्नशीपही पूर्ण केलीय आणि आता तो पूर्ण वेळ वैद्यकीय सेवेत रुजू झालाय.

भाषला 2002मध्ये खुनाच्या आरोपाखाली अटक झाली. कोर्टानं त्याला 2006मध्ये 14 वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली. त्यानं या शिक्षेच्या विरोधात दाद न मागण्याचा निर्णय घेतला आणि शिक्षा भोगण्यास सुरुवात केली. सुभाषचं जेलमधील वर्तन अतिशय चांगलं होतं. त्यामुळं त्याला 2016मध्ये 15 ऑगस्ट दिवशी जेलमधून मुक्त करण्यात आलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आयफोनपासून सॅमसंगपर्यंत सर्वच फोन महागणार! स्मार्टफोनच्या किमती ३० टक्क्यांनी वाढण्याची शक्यता, पण कारण काय?

२ डिसेंबरपासून पाच राशींचे अच्छे दिन! बुधाचं राशीपरिवर्तन देणार नोकरीसह व्यवसायातही फायदा, अडकलेले पैसेही मिळणार

Latest Marathi News Live Update : अमरावती महानगर पालिकेच्या सहाय्यक आयुक्तांना नगरसेवकाकडून मारहाण

Pune News : पुणे जिल्हा परिषदेचे २५ विद्यार्थी नासा दौऱ्यावर; स्टॅनफोर्ड विद्यापीठ आणि गुगल कॅम्पसलाही देणार भेट

Jatayu Earth's Centre: रावणाशी लढलेल्या जटायूचं भव्य शिल्प! PM मोदींच्या संभाव्य भेटीमुळे चर्चेत आलेलं हे ठिकाण कुठे आहे? जाणून घ्या कसं पोहोचाल

SCROLL FOR NEXT