JDS MLC SL Bhojegowda’s shocking disclosure about 2,500 dogs being killed and buried sparks political and public outrage in Karnataka.  esakal
देश

2500 Dogs Killed and Buried: ‘’मी तेव्हा २५०० कुत्रे मारून झाडांखाली पुरले होते'’ आमदाराचं थेट विधिमंडळातच विधान!

shocking disclosure about 2,500 dogs being killed and buried: जाणून घ्या, नेमका कोण आहे हा राजकीय नेता आणि त्याने असं का केलं होतं?

Mayur Ratnaparkhe

Karnataka JDS MLC SL Bhojegowda reveals shocking dog killing case involving 2,500 dogs: कर्नाटक विधानपरिषदेत मंगळवारचा दिवस बराच गदारोळाचा राहिला. सभागृहात भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या धोक्यांबाबत चर्चा सुरू होती. तितक्यात जेडीएसचे सदस्य एस.एल.भोजेगौडा यांनी असं काही विधान केलं, जे ऐकून सगळेच हबकले.

भोजेगौड यांनी सांगितलं की, जेव्हा ते चिक्कमगलुरू नगरपरिषदेचे अध्यक्ष होते तेव्हा त्यांनी अडीच हजार भटक्या कुत्र्यांना मारून झाडांखाली पुरलं होतं. त्यांनी सांगितलं की, असं केल्याने ते कुत्रे मातीत मिसळतील अन् नैसर्गिक खत बनतील.

हे ऐकताच सभागृहात उपस्थित अनेक सदस्य हैराण झाले. मात्र भोजेगौडा यांनी हे नाही सांगितलं, की ही घटना कोणत्या वर्षीची आहे. परंतु त्यांचा दावा होता की तेव्हा त्यांनी शहरातील गल्ल्यांमधून भटके कुत्रे हटवण्यासाठी पाऊल उचललं होतं.

कुत्रांचा मुद्दा असाच चर्चेत नाही आला. आकडेवारी सांगते की, या वर्षी कर्नाटकात आतापर्यंत २.४ लाख लोक कुत्र्यांच्या चाव्याचे शिकार बनले आहेत. यापैकी १९ लोकांचा मृत्यू रेबीज सारख्या भयानक आजाराने झाला आहे, हेच कारण आहे की सभागृहात या मुद्द्यावर गंभीर चर्चा झाली.

हे विधान अशावेळी आलंय आहे, जेव्हा सुप्रीम कोर्टाने दिल्ली-एनसीआरच्या अधिकाऱ्यांना निर्देश दिलेत की, सर्व भटक्या कुत्र्यांना लवकरात लवकर रस्त्यावरून हटवून कायमस्वरूपीच्या आश्रय ठिकाणांवर ठेवलं जावं. कुत्र्यांच्या चाव्याने विशेष करून मुलांमध्ये रेबीजचा धोका वाढतो आहे आणि हे जीवघेणं ठरू शकतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Katraj Accident : कात्रज चौकात चिकन वाहतूक करणाऱ्या टेम्पोला आग; वाहतुकीस अडथळा!

Pune ATS: जुबेरच्या लॅपटॉपमध्ये आक्षेपार्ह फाईल्स; अल-कायदासाठी काम, न्यायालयीन कोठडीत झाली रवानगी

PM Modi big Statement on Congress : बिहारमधील मानहानीकारक पराभवानंतर काँग्रेसचा मोठा गट फुटणार? ; मोदींच्या ‘त्या’ विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ!

Navale Bridge Accident : नवले पुलावरील अपघात प्रकरणी कंटेनर मालकासह तिघांवर गुन्हा दाखल

Latest Update News Marathi: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT